• Download App
    आम्हाला राजकीय विरोधक समजू नका; किमान आधारभूत किंमत वाढवून द्या | The Focus India

    आम्हाला राजकीय विरोधक समजू नका; किमान आधारभूत किंमत वाढवून द्या

    • आंदोलक शेतकऱ्यांची केंद्राकडे आग्रही मागणी

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापी सुटला नाही. केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात वाटाघाटीच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. कुणीच माघार घेत नाही. दुसरीकडे आम्हाला राजकीय विरोधक समजू नका. शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  Farmers’ protest day 29: ‘Will take two steps if Centre takes one,’ say protesters, demand higher MSP

    केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी किमान आधारभूत किंमत कोणत्याही परिस्थिती हट्विली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. पण शेतकरी आता ती वाढवून देण्याची मागणी करत आहेत. याबाबत त्यांनी केंद्राला पत्र पाठविले असून याबाबत ठोस निर्णय घ्यावा , असे आवाहन केले आहे दरम्यान, चर्चेची सहावी फेरी कधी होणार याचा तपशील मिळालेला नाही. Farmers  protest day 29: ‘Will take two steps if Centre takes one,’ say protesters, demand higher MSP

    शेतकरी आंदोलनातील घडामोडी

    कायद्यात किमान आधारभूत किमत देण्याबाबत ठोस कलम असाव. कायद्यात सुधारणा करून ती दिली जाईल, असे आम्हाला काही नको, असे शेतकरी सांगत आहेत.

    पंतप्रधान मोदी यांनी किमान आधारभूत किंमत वाढवून दिल्याचे मध्यप्रदेशातील शेतकरी संवादात नमूद केले. पण ही बाब शेतकऱ्यांना मान्य नाही. भारतीय किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकेत म्हणाले, आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी नेते दर्शन पाल म्हणाले, आधारभूत किमतीच्या यादीत 23 शेतमालांचा समावेश आहे. पपरन्तु सरकार तांदूळ आणि गहू खरेदी करते.

    आम्हाला राजकीय विरोधक मानू नका, असे पत्रात शेतकऱ्यांनी नमूद केलं आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी माओवाद्यांनी आंदोलन हायजॅक केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे शेतकरी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.

    शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कारण पश्चिम उत्तरभरत आणि देशातून शेतकरी आंदोलनासाठी दिल्ली सीमेवर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या सोशल मीडिया सेलने शेतकरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी वेबिनर आयोजित केला आहे. त्यात तज्ज्ञ आंदोलकांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत.

    Farmers’ protest day 29: ‘Will take two steps if Centre takes one,’ say protesters, demand higher MSP

    प्रधानमंत्री सन्मान निधीचा हप्ता 25 डिसेंबर रोजी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान त्यावेळी सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषिमंत्री तोमर यांनी सर्व प्रश्न चर्चेनेच सुटतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.

    अंबाला येथे हरियाणाचे मुख्यमंत्री यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडविला. या प्रकरणी 13 शेतकऱ्यावर आंदोलन करणे, खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम लावून गुन्हा दाखल केला होता.

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??