• Download App
    कृषी कायद्याच्या पाठींब्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा | The Focus India

    कृषी कायद्याच्या पाठींब्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा

    • मेरठमहुन इंदिरापुरम, गाझियाबादकडे रवाना

    विशेष प्रतिनिधी 

    मेरठ: शेतकरी आणि हिंद मजदूर किसान समितीच्या सदस्यांनी केंद्राच्या कृषी कायद्याचे स्वागत केले आहे. कायद्याला पाठींबा देण्यासाठी इंदिरापुरम, गाझियाबादकडे ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात केली. farmers in UP takes a tractor march in favor of farming bills

    दिल्ली सीमेवर पंजाब, हरियाणातील शेतकरी गेल्या 25 दिवसांपासून तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. पण आता या कायद्याला पाठींबा देण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत असल्याचे या समर्थन मोर्चाने स्पष्ट झाले.

    प्रतापपूर परिसरातील या समर्थन मोर्चाची व्हिडीओ क्लिप ट्विटद्वारे प्रसारित केली गेली आहे. त्यामध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन इंदिरापुरम, गाझियाबादकडे कूच करताना दिसत आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवर तिरंगा फडकत असून मेरे देश कि धरती सोना उगले, हिरे मोती हे गीत ही वाजविले जात आहेत.

    farmers in UP takes a tractor march in favor of farming bills

    कृषी कायद्याला पाठिंबा देणारे पाठिंब्याचे फलक प्रत्येक ट्रॅक्टरवर लावले आहेत. एकापाठोपाठ ट्रॅक्टर मार्गावरून धावत असल्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये पाहावयास मिळत आहे.

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!