विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेले काही दिवस मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियात चर्चेत असलेले राजधानीतले शेतकरी आंदोलन गायब झाले आहे. गेल्या आठ तासांमधील ट्विटर ट्रेंड लक्षात घेतला तर टॉप १० मध्ये शेतकरी आंदोलनाचा मागमूसही दिसत नाही. farmer agitation news
नवीन संसद भवनाचे भूमिपूजन, बेंगॉल सपोर्टस बीजेपी हे हॅशटॅग जोरात चालताना दिसत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस देखील ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतो आहे. पण या सगळ्यात गेले अनेक दिवस चर्चेत ठेवण्यात आलेले शेतकरी आंदोलन मात्र गायब झाले आहे. farmer agitation news
गेल्या चार – पाच दिवसांत शेतकरी आंदोलनात काँग्रेससह विरोधी पक्षांनी शिरकाव केला. भारत बंदच्या आवाहनापासून शेतकरी नेते यातून अलगदपणे बाजूला पडल्याचे दिसले. शेतकरी आंदोलनातले टॉप १० नेते अशा बातम्या माध्यमांनी चालवल्या त्याचवेळी याची जाणीव झाली, की आंदोलनातला मूळ शेतकरी झाकोळला जातोय.
farmer agitation news
त्यातच काल विरोधकांचे शिष्टमंडळ राहुल गांधी आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या मूळ बातम्यांपेक्षा या नेत्यांच्या बातम्या आणि त्यांच्या राजकीय हालचालींच्या बातम्या जास्त चालल्या. यातूनही शेतकरी आंदोलनातून शेतकरी गायब झाला. आणि आज तर ट्विटर सारख्या सोशल मीडियातूनही तो गायब झाल्याचा आढळला.