विशेष प्रतिनिधी
चांदवड : हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील उर्दुळ येथील शेतकऱ्यांनी मिरचीची रोपे मुळासकट उखडून फेकून दिली. farmer uprooted and thrown away Green Chilli
चांदवड तालुक्यातील उर्दुळ येथील शेतकरी दत्तू कारभारी ठाकरे यांनी उर्दुळ – दहिवद रोडवरीलएक एकरमध्ये हाकुनी व ओमिका जातीच्या मिरचीची लागवड केली होती. त्यासाठी ९५ हजार रुपये खर्च केला होता.
ही मिरची मालेगाव, लासलगाव येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी नेली. मिरचीला अवघा एक रुपया किलोने भाव पुकारला. यातून खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मिरचीची रोपे उपटून फेकून दिली.
- – शेतकऱ्याने मिरचीची रोपे उपटून फेकली
- – चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना
- – एक एकरात ९५ हजार रुपये खर्चून लावली होती
- – हाकुनी व ओमिका जातीच्या मिरचीची लागवड
- – मालेगाव, लासलगाव मार्केटमध्ये कवडीमोल भाव
farmer uprooted and thrown away Green Chilli