भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी शेतकरी आंदोलनाबाबतचा एक फोटो शेअर करत आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. या फोटोत शेतकºयांच्या हाता पोस्टर्स आहेत. त्यामध्ये नक्षली आणि दंगलीतील आरोपींचे फोटो आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता वेगळी दिशा घेतली आहे. या आंदोलनात शहरी नक्षलवादाचे आरोपी असलेले आंनद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा यांच्यासह दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद शरजील इमाम यांचे पोस्टर्स झळकले गेले. farmer protest Urban Naxals and riots accused news
भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी शेतकरी आंदोलनाबाबतचा एक फोटो शेअर करत आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. या फोटोत शेतकºयांच्या हाता पोस्टर्स आहेत. त्यामध्ये नक्षली आणि दंगलीतील आरोपींचे फोटो आहे. या सर्वांची सुटका करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना भाटिया म्हणाले, उमर खालिद आणि शारजील इमाम कधीपासून शेतकरी झाले? आम्ही शेतकºयांशी चर्चा करु, पण उमर आणि शारजील भारतविरोधी मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासारख्या लोकांची जागा तुरुंगातच आहे.
भारतीय किसान यूनियन एकता उगराहाच्या फेसबुक पेजवर याचा एक व्हिडीओ दिसतो आहे. यात आंदोलनातील शेतकरी आणि महिलांच्या हातात मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा यांच्यासह उमर खालिद आणि दिल्ली दंगलीचे आरोप असलेल्या शरजील इमाम याचे फोटो दिसत आहेत.
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खलिद, देशाविरुद्ध अतिशय आक्षेपहार्य विधाने करणारा शर्जील इमाम याच्यासह अनेकांना तुरुंगातून सोडण्याची मागणी शेतकरी संघटनांनी अधिकृतपणे केलेली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार हा व्हिडीओ टिकरी बॉर्डरवरीलच आहे. तेथे बीकेयू एकता उगराहाने 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस साजरा करत या सर्वांच्या सुटकेची मागणी केली. याच कार्यक्रमात तुरुंगात बंद असलेल्यांच्या नातेवाईकांनी व्यासपीठावर येऊन भाषणेही केली.
farmer protest Urban Naxals and riots accused news
अर्बन नक्षली आणि दंगलीतील आरोपींचा शेतकरी आंदोलनाशी संबंध काय अशी विचारणा आता होऊ लागली आहे. शरजील इमाम हिने आसाम भारतापासून तोडून टाका असे वक्तव्य केले होते. जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेल्या उमर खालीदने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौºयाच्या वेळी दिल्लीमध्ये दंगली घडविण्याचा कट केला होता.