वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात हिंदूंना गद्दार म्हणत आणि इंदिरा को ठोक दिया, मोदी क्या चीज है, अशी गरळ ओकली ज जात आहेत. यात माजी क्रिकेटपटू योगराज सिंग भर टाकत आहेत. आता ते मुघलांची गुलामी करणारे हिंदू गद्दार असे म्हटले आहेत. farmer agitation news
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. परंतु हिंदूंबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. farmer agitation news
योगराज सिंग यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच सध्या ट्विटरवर Arrest Yograj Singh’ हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.
farmer agitation news
अनेकांनी योगराज सिंग यांचे हे भाषण निंदनीय, अपमानजनक आणि घृणा आणणारे असल्याचे म्हटले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे. यादरम्यान त्यांनी हिंदूंसाठी गद्दार या शब्दाचाही वापर केला. “हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असेही ते यात म्हणताना दिसत आहे. तसंच महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यापूर्वी योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.