• Download App
    शेतकरी आंदोलनाचे फोटो पाहिल्यावर बहुतेक जण शेतकरी दिसत नाहीत, व्ही. के. सिंह यांची टीका | The Focus India

    शेतकरी आंदोलनाचे फोटो पाहिल्यावर बहुतेक जण शेतकरी दिसत नाहीत, व्ही. के. सिंह यांची टीका

    जेव्हा आपण आंदोलनाचे फोटो पाहतो तेव्हा त्यात बहुतेक जण शेतकरी दिसून येत नाहीत. अतिशय कमी शेतकरी या आंदोलनात आहेत. जे शेतकऱ्यांच्या हिताचे तेच सरकारने केले आहे, असे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. farmer agitation news


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जेव्हा आपण आंदोलनाचे फोटो पाहतो तेव्हा त्यात बहुतेक जण शेतकरी दिसून येत नाहीत. अतिशय कमी शेतकरी या आंदोलनात आहेत. जे शेतकऱ्यांच्या हिताचे तेच सरकारने केले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे. farmer agitation news

    माजी लष्करप्रमुख असलेल्या व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे की, स्वामीनाथन समितीच्या अहवालातही शिफारस करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आपले उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळावं. शेतकऱ्यांवर कुठलीही बंधनं असू नये, अशी मागणी वेळोवेळी केली गेली. आपलं उत्पादन बाजारात विकायचं असेल तर ते विका आणि तुम्हाला जर बाहेर विकायचं असेल तर तेही विकू शकतात, हे काम सरकारने केलं आहे. या आंदोलनामागे विरोधी पक्षासह कमिशन खाणाऱ्यांचा हात आहे.

    farmer agitation news

    दरम्यान, दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे, असे हरयाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी सुनावले आहे. जे. पी. दलाल यांनी सर्व शेतकरी बांधवांंनी सदबुद्धीने विचार करावा. चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!