एमएसपी (किमान आधारभूत किंमत) आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा छळ करणारे आता कृषी कायद्याबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. farmer agitation news
वृत्तसंस्था
वाराणसी : एमएसपी (किमान आधारभूत किंमत) आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा छळ करणारे आता कृषी कायद्यांबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. farmer agitation news
वाराणसी येथे बोलताना मोदी म्हणाले की, मी वाराणसीच्या पवित्र भूमीवरून सांगू इच्छितो. आता कट कारस्थान करुन नाही, तर गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे काम केले जात आहे. भ्रम पसरवणाऱ्यांचे सत्य देशासमोर येत आहे. आज ज्या शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत शंका आहे, ते देखील भविष्यात याचा लाभ घेतील. जर जुन्या यंत्रणेद्वारे व्यवहार योग्य समजला जात असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही. नवीन कायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
सरकारने एखादा कायदा तयार केला तर त्याला पाठिंबा व विरोध दोन्ही केले जाते. पूर्वी सरकारचा निर्णय कोणालाही आवडायचा नाही, त्याला विरोध व्हायचा. आता प्रचार केला जातो की, निर्णय योग्य आहे. पण पुढे चालून काय होईल हे सांगता येणार नाही. जे होणारच नाही त्याबद्दल समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. चोवीस तास काही मंडळींचे हेच काम आहे, असे म्हणत मोदींनी विरोधांवर टीका केली.
कॉंग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, हे तेच लोक आहेत ज्यांनी दशकांपासून शेतकऱ्यांचा छळ केला. आधी जमिनदारीच्या नावावर छळ केला. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचा फायदा होत नव्हता. कर्जमाफीच्या नावावर छळ केला गेला. शेतकऱ्यांच्या नावे मोठ्या योजना बनविल्या गेल्या, पण फक्त 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात असे ते मानायचे. अनेक अनुदान देण्यात आले. पण त्यातही घोटाळे व्हायचे. शेतकऱ्यांना उत्पादकता वाढविण्यास सांगितले. एखाद्याची उत्पादनक्षमता दुसऱ्या एखाद्यासाठी निश्चित केली गेली.
farmer agitation news
पीक खरेदीची आकडेवारी सांगताना मोदी म्हणाले की, 2014च्या पाच वर्षात संपूर्ण देशात 650 कोटींची डाळ खरेदी केली. आमच्या पाच वर्षांच्या काळात 49 हजार कोटींच्या डाळी एमएसपीवर खरेदी केल्या. यामध्ये 75 पटीने वाढ आहे. आधीच्या सरकारने 2 लाख कोटींचे धान्य खरेदी केले, आम्ही 5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. काँग्रेस सरकारने पाच वर्षांत 1.5 लाख कोटींचा गहू खरेदी केला, तर आम्ही 3 लाख कोटींचा गहू खरेदी केला. जर मंड्या संपवायच्या असत्या तर मग आम्ही त्यांना एवढे मजबूत का केले असते असा प्रश्न मोदी यांनी केला.