केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर विचारविनिमय करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. farmer agitation news
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर विचारविनिमय करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. farmer agitation news
बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषीमंत्री नरेंद्र तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा झाली. ही बैठक सुमारे दोन तास चालली. शेतकऱ्यांनी अमित शहा यांचा सशर्त चर्चेचा प्रस्ताव नाकारल्यावर ही बैठक झाली.
अमित शहा यांनी शनिवारी शेतकऱ्यांना ३ डिसेंबरला चर्चेचे आमंत्रण दिले होते. जर शेतकऱ्यांना ३ डिसेंबरपूर्वीच चर्चा करायची असेल, तर त्यांनी दिल्ली-हरयाणा सीमा सोडून बुराडीच्या निरंकारी मैदानात आंदोलन केले पाहिजे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. सरकार शेतकऱ्यांशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. या पूर्वी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देखील शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते.
farmer agitation news
चर्चा करण्यासाठी सरकार आमच्यावर अटी लादत आहे. आम्ही दिल्ली-हरयाणा सीमेवर निदर्शने करतच राहू असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. सरकारने एक प्रस्ताव शेतकरी नेत्यांपुढे मांडला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.