• Download App
    शेतकऱ्यांप्रती तुमचा कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू; कॅप्टन अमरिंदर सिंग केजरीवालांवर कडाडले | The Focus India

    शेतकऱ्यांप्रती तुमचा कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू; कॅप्टन अमरिंदर सिंग केजरीवालांवर कडाडले

    • शुद्र विचारांचा खुजा राजकारणी असल्याची बोचरी टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची धडपड सुरूच आहे. तुमचा शेतकºयांप्रति कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका अमरिंदरसिंग यांनी केजरवालांवर केली आहे. शुद्र विचारांच्या खुजा माणसाचे राजकारण असेही त्यांनी म्हटले आहे. farmer agitation latest news

    अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे की, क्षुद्र विचारांचे राजकारण करणाऱ्या खुज्या माणसा, केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांना पंजाबने जसा विरोध केला तसा तुम्ही दिल्ली विधानसभेत ठराव का केला नाही? त्याऐवजी केंद्राच्या कायद्यांना लटका विरोध करत राहिलात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तुरुंग म्हणून मैदानांची मागणी धुडकावण्यास तुम्हाला भीती वाटते. कारण त्यामुळे केंद्र सरकारला राग येईल. त्यामुळेच तुमचा शेतकऱ्यांप्रति कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहणार नाही. त्यामुळे दिशाभूल करणे सोडून द्या. farmer agitation latest news


    यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करताना केजरीवाल म्हणाले होते की, “अमरिंदर सिंग यांना कृषी विधेयकं रोखण्यासाठी अनेकदा संधी आली होती. त्यावेळी त्यांनी ही विधेयकं का रोखली नाहीत? असा सवाल पंजाबची जनता करत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह हे केंद्र सरकारच्या समितीवर होते. समितीमध्ये असताना त्यावेळी या काळ्या कायद्यांना विरोध का केला नाही. त्यांनी तेव्हा ती का रोखली नाहीत?

    farmer agitation latest news

    राष्ट्रपतींनी ज्या दिवशी कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांचं कायद्यात रुपांतर झालं. हे कायदे रोखण्याची ताकद कोणत्याही राज्यात नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हे सर्व माहित होतं तर मग त्यांनी आपल्यावर खोटे आरोप का केले?”

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??