कृषी कायद्यांना विरोध करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात त्या विरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. महाआघाडीतील पक्षांमधील प्रेम पुतणा-मावशीचं आहे. त्यांची आघाडी 5 वर्षे नाही, तर 5 हजार वर्षे टिकू द्या, फक्त जनतेला जगू देत, अशी टीकाही त्यांनी केली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कृषी कायद्यांना विरोध करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात त्या विरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. महाआघाडीतील पक्षांमधील प्रेम पुतणा-मावशीचं आहे. त्यांची आघाडी 5 वर्षे नाही, तर 5 हजार वर्षे टिकू द्या, फक्त जनतेला जगू देत, अशी टीकाही त्यांनी केली. farmer agitation in punjab
मुनगंटीवार म्हणाले की, शेतकरी कायद्याचा अर्थ चुकीचा काढला जातोय. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यात कोणताही मुद्दा पटत नसेल, तर चर्चा आणि संवाद करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने कायदा वाचला, तर अर्थ समजेल. farmer agitation in punjab
उणीव असेल तर पंतप्रधान मोदी यांची वेळ घेऊन भेटा आणि चर्चा करा. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करता, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करायचा असेल, तर मग राज्यात अध्यादेश का काढत नाही?
शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा धोका, सर्वोच्च न्यायालयात आंदोलकांना हटविण्याची मागणी करणारी याचिका
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला संताजी-धनाजींप्रमाणे मोदी-शहा सतत स्वप्नातही दिसतात. त्यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का? तुम्ही 5 वर्षे नको, तर 5 हजार वर्ष एकत्र राहा. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला जगू द्या आणि टिकू द्या. तुमचं प्रेम पुतना मावशीप्रमाणे विखारी आहे. हे नेते सत्ताप्रिय आहेत.
farmer agitation in punjab
तुमच्या कुटुंबातील कोणी मंत्री होणार नाही अशी शपथ घ्या. ते घराणेशाही चालवत आहेत, असा घणाघातही मनुगंटीवार यांनी केला.