- भारत आणि प्रगतिशील देशातील शेतकरी अनुदान ना कॅनडासह प्रगत देशांचा विरोध
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची दांभिकता उघड झाली आहे. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या सध्याच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला हे खरे, परंतु भारतीय शेतकरी ज्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत त्या मागण्यांपैकी शेतकरी अनुदान आणि किमान आधारभूत किंमत या दोन्ही बाबींना कॅनडाने नेहमीच विरोध केला आहे, या बाबीकडे कॅनडाच्या पंतप्रधानांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. farmer agitation news
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी ट्वीट करून कॅनडाच्या पंतप्रधानांची ही दांभिकता उघड केली आहे. भारतात आणि शेतीप्रधान विकसनशील देशांमध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाणे यांचे अनुदान दिले जाते. याखेरीज अन्य अनुदानेही सरकारे देतात. परंतु जागतिक व्यापार संघटनेत प्रगत देश या अनुदानांना नेहमी विरोध करत असतात. यात कॅनडाचा ही समावेश आहे. farmer agitation news
या प्रगत देशांना अन्नधान्याच्या बाबतीत प्रगतीशील देशांची स्वयंपूर्णता नको आहे. त्याचबरोबर हे प्रगतीशील देश अन्नधान्याच्या बाबतीत निर्यातक्षमही बनता कामा नयेत याकडे कॅनडासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या खंडातील देशांचा कटाक्ष आहे.
farmer agitation news
जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडातील शीख वोट बँकेकडे लक्ष ठेवून भारतातील विशेषत: पंजाबमधील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु हे शेतकरी मांडत असलेल्या मुद्द्यांना कॅनडाचा विरोध असल्याकडे ते कानाडोळा करत आहेत. नेमकी ही दांभिकताच शेखर गुप्ता यांनी उघड केली आहे.