वृत्तसंस्था
नाशिक : नाशिक पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीने नोटा छापण्याचा एक कारखाना सुरु केल्याचे तपासात उघड झाले. त्यांनी किती बनावट नोटा छापल्या आणि किती वितरित केल्या, याचा शोध घेण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विशेष म्हणजे एका भाजीवल्या महिलेच्या सतर्कतेमुळे या घटनेचा सुगावा लागला आहे. Fake note printing gang nabbed in Nashik; Seven arrested
कोरोनात बेरोजगारीचं संकट ओढावलं. त्यामुळे या टोळीने चक्क नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापायच्या आणि त्या आदिवासी ग्रामीण भागात खरेदी विक्रीच्या व्यवहारातून चलनात ही टोळी आणत होती.
उंबरठाण गावात भाजीविक्रेत्या महिलेला १०० रूपयांची बनावट नोट दिल्याचे लक्षात आले. स्थानिकांनी तिघांन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर निफाड तालुक्यातील विंचुर गावात किरण गिरमेच्या प्रेसमध्ये नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने त्यांनी नोटा छापण्याचा उद्योग सुरू केल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी अटक केलेल्या ,७ जणांकडून ६ लाख १८ हजार २०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
नोटा छापण्याचे साहित्य जप्त
नोटा छापण्यासाठी लागणरे संगणक, प्रिंटर स्कँनर, झेरॉक्स मशीन, मोबाईल , मोटार जप्त केली. तिघांना न्यायालयायीन कोठडी तर उर्वरित आरोपींना पोलिस कोठडी सुनवली आहे. त्यामुळे बनावट नोटा छापून कुठे वितरीत केल्या जात होत्या? किती नोटा चलनात आणल्या आहेत,? रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का? या दिशेने तपास सुरू आहे.
Fake note printing gang nabbed in Nashik; Seven arrested
महत्त्वाच्या बातम्या
- प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा
- भाजपने चार मुख्यमंत्री बदल्याच्या बदलण्यावरून गडकरींच्या टोलेबाजीची माध्यमांची मखलाशी, पण काँग्रेसमधील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या अस्वस्थतेचे काय?
- Defamation case : कंगना रणावत न्यायालयात पोहोचलीच नाही, न्यायाधीश म्हणाले – जर ती पुढील सुनावणीला आली नाही तर तिच्या नावाचे अटक वॉरंट जारी केले जाईल
- आमचेही प्रश्न सोडवा; शिवसैनिकाचा टाहो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास