वृत्तसंस्था
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील बनावट खात्यांचा गाशा गुंडाळावा, असा आदेश केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने या क्षेत्रातील कंपन्याना दिले आहेत. Fake accounts on social media promptly Removed Instantly ; Orders of the IT department of the Center
आयटीच्या नव्या नियमांनुसार, केंद्र सरकारने ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या आघाडीच्या सोशल मीडिया कंपन्यांना हे आदेश दिले आहेत. त्या म्हंटले की, काही अज्ञात व्यक्ति, व्यवसायांची बनावट प्रोफाइल चित्रे असलेली खाती आणि सर्वसाधारण ग्राहक यांची बनावट खाती काढून टाकावीत. त्यासाठी २४ तास अगोदर संबंधिताला सूचना द्यावी, असे म्हंटले आहे. या निर्णयामुळे भारतातील सोशल मीडियावरील तोतयागिरीचा धोका संपेल, अशी अपेक्षा आहे.
तक्रार मिळाल्यानंतर लगेचच सोशल मीडियातील दिग्गजांनी पावले उचलावीत. “उदाहरणार्थ, एखादा चित्रपट अभिनेता, क्रिकेटपटू, किंवा राजकारणी किंवा एखादा अन्य वापरकर्त्याने, अनुयायी मिळवण्यासाठी किंवा त्यांचे संदेशन अधिक दृश्यमान करण्यासाठी किंवा कोणत ही बेकायदा कृत्य केले. म्हणजेच प्रतिमा / चित्र वापरणारले. त्याला संबधीत व्यक्तीने आक्षेप घेतला तर मग ते खाते रद्द करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांच्या नव्या आयटी नियमात या तरतुदींचा समावेश केला आहे आणि वापरकर्त्याने सूचित केल्यावर त्यांना एका दिवसात उपचारात्मक कारवाई करावी लागेल, ‘असे टाईम्स ऑफ इंडियाने अधिकृत सूत्रांचे हवाला देऊन नमूद केले आहे
लोकप्रिय व्यक्तिमत्व, प्रभाव टाकणारे, कार्यकर्ते आणि अगदी कॉर्पोरेट्स / व्यवसाय यांच्यासाठी तोतयागिर हा मोठा धोका आहे. कारण ते कायदेशीर खात्याची नक्कल करतात. त्या द्वारे आर्थिक फसवणूक होते. यापैकी काही खाती लोकप्रिय व्यक्तींच्या चाहत्यांनी तयार केली आहेत आणि चालविली जातात. अशा प्रवृत्तीना आळा बसण्यास मदत मिळणार आहे.