रशिया युक्रेनमधील युद्धाचा संघर्ष वाढत असताना दुसरीकडे रशियाची कोंडी करण्यासाठी इतर देश सज्ज झाले आहेत.
रशियाची कोंडी करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने रशियाला बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियात हे तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन आहेत. याआधी फेसबुकने रशिया विरोधात काही निर्बंध लागू केले होते मात्र आता या तिन्ही माध्यमांनी रशियाला बॅन केले असून रशियाची कोंडी करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. ही तिन्ही माध्यमे जगभरात वापरले जातात. त्यामुळे अशा प्रकारे रशियाची आणि पुतिन यांनी कोंडी करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :फेसबुकची मूळ कंपनी मेटाने रशियावर कडक बंदीची घोषणा केली आहे. शुक्रवारी, एक निवेदन जारी करण्यात आले त्यात रशियन सरकारला फेसबुकवर आपल्या जाहिराती पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे.सोशल मीडिया दिग्गज फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सने रशियन राज्य माध्यमांना जगभरात कुठेही जाहिराती चालवण्यास किंवा त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पैसे कमविण्यास बंदी घातली आहे.Facebook ban Russian media:Meta Company’s big retaliation against Russia! Closed source of income; The Russian media company will no longer be able to advertise on Facebook
फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवर रशियन मीडियाला पोस्ट करण्यास बंदी घातली आहे. यासह, रशियन सरकारी मालकीची मीडिया कंपनी पैसे कमवण्यासाठी फेसबुकचा वापर कोणत्याही स्वरूपात करू शकणार नाही. फेसबुकच्या सुरक्षा धोरणाचे प्रमुख, नॅथॅनियल ग्लेचर यांनी ट्विट केले की, आम्ही रशियन सरकारी मालकीचे माध्यम फेसबुकवर बंद केले आहे. रशियन मीडिया यापुढे फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात करू शकणार नाही.
रशियावर लष्करी कारवाईशिवाय पाश्चात्य देश सर्व प्रकारचे निर्बंध जाहीर करण्यात गुंतले आहेत. काल अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधांची घोषणा केली होती आणि आता अमेरिकन कंपन्याही या निर्बंधांना पुढे करत आहेत. फेसबुकने रशियन सरकारी मालकीच्या रशियन मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात करण्यावर आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही स्वरूपात पैसे कमविण्यावर बंदी घातली आहे.