• Download App
    आमने - सामने : कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही : संजय राऊत ! तुमच्या वक्तव्याची जागा केराच्या टोपलीत ! सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारलं..Face to face: We do not expect justice from the court: Sanjay Raut! Throw your statement in the dustbin! Supreme Court slaps Sanjay Raut ...

    आमने – सामने : कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही : संजय राऊत ! तुमच्या वक्तव्याची जागा केराच्या टोपलीत ! सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारलं…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये काय छापून येतं याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. या गोष्टींची पर्वा न करता आम्ही निर्णय देतो.अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली हीच आहे अशा शब्दांत कोर्टाने संजय राऊतांना फटकारलं आहे.FACE TO FACE : We do not expect justice from the court: Sanjay Raut! Throw your statement in the dustbin! Supreme Court slaps Sanjay Raut …

    काय म्हणाले होते संजय राऊत?

    काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नसल्याचं वक्तव्य केलं होतं.

    काही लोकांना दिलासा दिला जातो, मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही. २५ लोकं आहेत ज्यांच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो. परमबीर सिंग यांच्यासारख्या २५ लोकांना दिलासा मिळाला, मात्र महाविकास आघाडीच्या कुठलाही नेत्यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही”.

    यावर आज कोर्टाची भूमिका ….

    जस्टीस संजय किशन कौल आणि जस्टीस एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली . यावेळी खंडपीठाने संजय राऊत यांच्या वक्तल्याचा दाखला देत आपली नाराजी व्यक्त केली.

    “प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली हीच आहे”, अशा शब्दांत कोर्टाने राऊतांवर ताशेरे ओढले आहेत.

    FACE TO FACE : We do not expect justice from the court: Sanjay Raut! Throw your statement in the dustbin! Supreme Court slaps Sanjay Raut …

    Related posts

    Sonu Sood : हम बैल भेजते है… लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदने दिली मदतीची ग्वाही

    2289 महिला सरकारी कर्मचाऱ्यांचा लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला, पात्र नसताना उपटला फायदा!!

    नाशकात भाजपात प्रवेशाची भाऊगर्दी, आपापसांतच करणार धुमश्चक्री; विरोधकांची उद्ध्वस्त वस्ती!!