आमने-सामने : तेजस्वी सुर्यांचे घराणेशाहीवर बोट म्हणाले देशात आता एकच बेरोजगार काँग्रेसचे युवराज ; सुप्रिया सुळेंचा संताप म्हणाल्या प्रीतम मुंढे-पुनम महाजन-पियूष गोयल कोण?
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं आपली सत्ता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक देशाला गरीब ठेवल.
सध्या देशात कुणी बेरोजगार असेल तर फक्त काँग्रेसचे युवराज आहेत .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते तेजस्वी सूर्या यांनी काल काँग्रेसवर आणि त्यांच्या घराणेशाहीवर जोरदार निशाणा साधला.सूर्या म्हणाले, समाजवादी विचारसरणी असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं घराणेशाही चालू ठेवण्याच्या उद्देशानं देशाला गरीब ठेवलं. मोदी सरकारच्या आधी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एका कुटुंबाच्या (गांधी घराणं) ताब्यात होता.Face-to-face: Tejaswi Surya point to the dynasty, now the only unemployed Congress prince in the country; Supriya Sule replied with anger
यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला .त्या म्हणाल्या काँग्रेस मध्ये घराणेशाही आहे तर भाजपच्या पुनम महाजन प्रीतम मुंढे पियूष गोयल यांचे काय ?
लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) वरील चर्चेत भाग घेत सूर्या म्हणाले, यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं आपली सत्ता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक देशाला गरीब ठेवलं.
बंगळुरू दक्षिणचे खासदार सूर्या पुढे म्हणाले, काँग्रेसच्या घराणेशाहीमुळं देशाची अर्थव्यवस्था बिघडली असून मोदी सरकारच्या काळात ती सुधारलीय. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे घराणेशाही नेते आपली राजकीय बेरोजगारी ही देशाची बेरोजगारी समजून गोंधळ घालत आहेत.
या देशात जर कोणी बेरोजगार असेल तर तो काँग्रेसचा ‘युवराज’, काँग्रेसचा वंशज आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय.
राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा; ‘नगराध्यक्ष’ शर्यतीतून भाजप, सेनेची माघार
राहुल गांधींच्या ‘दो हिंदुस्तान’च्या विधानाचा संदर्भ देत तेजस्वी म्हणाले, होय.. दोन भारत आहेत; एक केंद्रात आणि दुसरा 2014 नंतरचा भारत, असं त्यांनीl नमूद केलं.
तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी सभागृहातील चर्चेत भाग घेत सूर्या यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. घराणेशाहीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कर्नाटकातील भाजप आमदार रवी सुब्रमण्यम यांच्याशी सूर्यांचा संबंध काय?
असा थेट सवाल सुळेंनी विचारलाय.
त्यांनी भाजप सदस्य प्रीतम मुंडे, पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, एस. विखे-पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही नावंही घेतली आहेत.