• Download App
    आमने-सामने : पेन ड्राईव्ह बॉम्ब -वळसे पाटील म्हणतात फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का?... फडणवीस म्हणाले सोशीत पिदीतांसाठी  मी FBI-म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ .... Face-to-face: Pen drive bomb - Valse Patil says is there a detective agency of Fadnavis? Fadanvis says yes i am FBI

    आमने-सामने : पेन ड्राईव्ह बॉम्ब-वळसे पाटील:फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का?… फडणवीस म्हणाले सोशीत-पिडीतांसाठी मी FBI-म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ ….

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती महाराष्ट्राच्या वाघाची .देवेंद्र फडणवीस यांची..फडणवीस एक्स्प्रेस सुसाट निघाली आहे . देवेंद्र फडणवीस हे एका पाठोपाठ एक असे पेन ड्राईव्ह बॉम्ब महाराष्ट्रातील ठाकरे पवार सरकारवर टाकत आहेत. याच गोष्टीवरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांना टोमणा लगावला फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का? यालाच उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं की, मी एक FBI काढली आहे. म्हणजेच ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ ….Face-to-face: Pen drive bomb – Valse Patil says is there a detective agency of Fadnavis? Fadanvis says yes i am FBI

    काय आहे प्रकरण ?

    वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचे दाऊदशी संबंध असल्याचं संभाषण असल्याचे पुरावे असलेला आणखी एक पेन ड्राईव्ह फडणवीसांनी सभागृहात सादर केला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या सगळ्या संदर्भात उत्तर देताना असं म्हटलं की, फडणवीसांनी आतापर्यंत अनेकदा पेन ड्राईव्ह दिले आहेत. तुमची एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का? असा टोमणा वळसे पाटीला यांनी लगावला.

    काय म्हणाले फडणवीस?

    गृहमंत्र्यांना सांगा की मी एक FBI काढला आहे. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. अरे विरोधी पक्ष नेत्याचं कामच आहे. विरोधी पक्ष नेत्याकडे सोशीत, पीडित असे सगळे लोकं पुरावे आणून देत असतात.’

    ‘कारण त्यांना अपेक्षा असते की, सरकारकडून जिथे अन्याय होतोय तिथे विरोधी पक्षनेता आपल्याला न्याय मिळवून देईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्याकडे येत असतात. अजून येणार आहेत.. येतीलच. लोकं आणूनच देतात. मला मांडावेच लागेल.’ असं म्हणत फडणवीस यांनी वळसे-पाटलांनाचा चिमटा काढला.

    Face-to-face: Pen drive bomb – Valse Patil says is there a detective agency of Fadnavis? Fadanvis says yes i am FBI

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??