- भविष्यातील महाराष्ट्रातल्या पिढ्या हे राजकारण पाहताय, ते यातून काय शिकतील?- राज यांचा संजय राऊत यांना सवाल.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ केली .आता पर्यंत गप्प असणारे राज ठाकरे मात्र काल मनसेच्या वर्धापन दिनी थेट बोलले आहेत .त्यांनी मर्मावर बोट ठेवत अनेक सवाल ठाकरे पवार सरकारला विचारले आहेत .विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून तुम्ही शिव्यांच राजकारण करता यातून पुढची पिढी काय शिकणार ?असा मार्मिक प्रश्नही त्यांनी संजय राऊत यांना विचारला.त्यांनी आपल्या खास शैलीत राऊत यांची नक्कल देखील केली आहे .यावर भडकलेल्या संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत राज यांना नकली म्हंटले आहे .Face to face: No women, no students – no ST – no development – just swearing! Raj gets angry over politics – mocks Sanjay Raut by copying – Raut says you are a duplicate-fake …
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांनी नक्कल करत खिल्ली उडवली आणि राजकारणामध्ये येणारी पिढी काय शिकणार?असा घणाघाती सवालही संजय राऊत यांना विचारला.काल मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
संजय राऊत यांच्या शिवीगाळ प्रकरणाचा राज यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.
सध्या सकाळी टीव्ही लावला की ते संजय राऊत येतात, काय ते राऊत,किती बोलतात, कसं बोलतात…? बोलणं हा मुद्दा नाहीय, पण काय बोलावं, कसं बोलावं”, असं म्हणत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली.
“भुवया उडवून बोलणं, हावभावाने बोलणं, आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या त्यांची ही नाटकी पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?”, असं म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतनाची गरज असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
‘ते संजय राऊत, तो क्या हुआ, एक बात ऐसी है. ये करते है’ असं म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल काढली. टीव्ही सुरू झाला की, हे सुरू झाले. कॅमेरा बंद झाला की, हे लगेच नीट झाले’ असा सणसणीत टोला राज यांनी राऊतांना लगावला.
‘काय प्रकारचे आरोप करत आहे. टीव्हीवर काय बोलतात, शिव्या काय देताय. राजकारणामध्ये येणाऱ्या पिढ्या काय करणार आहे काय पाहत असतील. राज्याच्या राजकारणात हे सुरू आहे.
‘कुणी महिलांबद्दल बोलत नाही, विद्यार्थी घरी आहे, त्याबद्दल कुणी बोलत नाही. त्यांच्या भविष्याबद्दल बोलत नाही. एसटी बस सुरू होणार आहे की नाही, याबद्दल या लोकांना काहीही पडले नाही’ अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
‘जी लोकं आपल्याला मतदान करतात ना त्यांचे आभार माना.महाराष्ट्रातून लोकं आपल्याकडे येतात, सरकारकडे जात नाही. त्यामुळे तो आपला पक्ष आहे. लोकं ज्या विश्वासाने आपल्याकडे येतात ना 16 वर्षांतली ही कमाई आहे.
यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया-
जशास तसं उत्तर देत भडकलेले राऊत म्हणाले नक्कल ही मोठ्या माणसांचीच केली जाते.शिवसेना ‘नकली ‘ नाही .
आमचं राजकारण हे नकलांवर चालत नाही .
संजय राऊत खूप बोलतात असं राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता संजय राऊत म्हणाले, “मग त्यांनी बोलावं, सगळ्यांनीच बोलायला हवं अशी परिस्थिती सध्या आहे. ईडीने आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहणार कारण आम्ही कोणालाही मिंधे नाहीत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, इथे डुप्लिकेट-नकली असं काहीच नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आमचं राजकारण नकलांवर चालत नाही ते संघर्षावर उभं आहे”.
मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबद्दल राज यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत संजय राऊतांनी काही लोकं ही आजारी नसतानाही सक्रीय नसतात.
मुख्यमंत्र्यांइतक सक्रीय कोणीच नाही. ते सक्रीय आहेत म्हणूनच राज्य पुढे चालतंय असं म्हणत राज यांना टोला लगावला.