• Download App
    आमने सामने : फारुख अब्दुल्लाचा स्वतःला निर्दोष दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पल्लवी जोशींनी हाणून पाडला ..म्हणाल्या २दिवस आधी राजीनामा अन् लंडन वारी हा योगायोग नव्हे ...Face to face: Farooq Abdullah's apologetic attempt to prove his innocence was thwarted by Pallavi Joshi.

    आमने सामने : फारुख अब्दुल्लाचा स्वतःला निर्दोष दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पल्लवी जोशींनी हाणून पाडला ..म्हणाल्या २दिवस आधी राजीनामा अन् लंडन वारी हा योगायोग नव्हे ….

    फारुख अब्दुल्ला एका मुलाखतीत म्हणाले होते की, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या प्रकरणासाठी जबाबदार असल्याचे आढळल्यास मी सुळावर चढण्यास तयार आहे. 

    फारुख अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यावर आता  अभिनेत्री पल्लवी जोशींनी पलटवार केला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्रीचा ‘ द काश्मीर फाइल्स  ‘ हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालतोय . या चित्रपटाने 200 कोटींची आकडा पार केला आहे . हा चित्रपट 90 च्या दशकात काश्मीरी पंडितांच्या पलायन  आणि  नरसंहारावर आधारित आहे . जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी नुकतेच या घटनेसाठी मी जबाबदार नाही असं सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, त्यांच्या राजवटीत ही दुर्घटना घडली नाही. या हत्याकांडासाठी ते जबाबदार असल्याचे आढळल्यास त्यांना देशात कुठेही फाशी देण्यात यावी.असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.यावर ‘द काश्मीर फाइल्स’ अभिनेत्री पल्लवी जोशींनी जोरदार पलटवार केला आहे . नरसंहराच्या दोन दिवस आधी राजीनामा अन् लगेच लंडनला पलायन हा योगायोग कसा ?Face to face: Farooq Abdullah’s apologetic attempt to prove his innocence was thwarted by Pallavi Joshi.

    पल्लवी जोशी म्हणाल्या की, हा चित्रपट सखोल संशोधनानंतर तयार करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पुराव्याचे व्हिडिओही आहेत. ‘खरं सांगायचं तर राजकारण हे माझं क्षेत्र नाही त्यामुळे राजकारण्यांना कसं उत्तर द्यायचं हे मला कळत नाही, पण आम्ही जे काही केलं आहे त्यासाठी आम्ही ४ वर्षे संशोधन केलं. माझ्याकडे पोलिसांपासून प्रशासन, काश्मिरी पंडित आणि त्यावेळच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ आहेत. आमच्याकडे प्रत्येक घटनेचा पुरावा आहे जो आम्ही व्हिडिओच्या रूपात चित्रपटात दाखवला आहे. मला वाटत नाही की 700 लोक एकत्र खोटे बोलू शकतात.7 लाख लोकांनी तेथून स्थलांतर केले.

    पल्लवी जोशी पुढे म्हणाल्या की, फारुख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांच्या निर्दयी हत्येच्या दोन दिवस आधी राजीनामा देऊन लंडनला गेले होते. जगमोहन यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु खराब हवामानामुळे ते होऊ शकले नाहीत. ते दोन-तीन दिवस जम्मूमध्ये राहिले आणि त्याचं काळात हा निर्दयी नरसंहार झाला.

    काय म्हणाले होते अब्दुल्ला ?

    फारुख अब्दुल्ला आधी या काश्मीरी पंडितांच्या नरसंहार म्हणजे प्रपोगंडा म्हणाले .मात्र जनतेचा रोष अन् सत्य यापुढे त्यांना माघार घ्यावी लागली .त्यांनी यू टर्न घेत स्वतःला safeside करण्याचा प्रयत्न केला.म्हणाले मी यासाठी दोषी नाही मी तर राजीनामा दिला होता मी दोषी असेल तर मला फासी द्या .

    Face to face: Farooq Abdullah’s apologetic attempt to prove his innocence was thwarted by Pallavi Joshi.

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य