पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला बिनकामाचे म्हणत एक सल्ला दिला. त्यावरुनच अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केलाय.Face to face: Congress against Trinamool Congress! Mamata Banerjee says don’t take Congress with you – impatient Ranjan Chaudhary of Congress says ‘crazy’ Mamata Banerjee …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपच्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेस सोबतच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस देखील चांगलेच बिथरले आहेत . प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत .काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला .सोबतच काँग्रेस पक्ष आता काही कामाचा राहिला नसून आपण आपली वेगळी आघाडी निर्माण करू असेही त्या म्हणाल्या.मात्र यावर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी चांगलेच भडकले आहेत त्यांनी ममता बॅनर्जींना थेट पागल म्हंटले आहे .
ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी देशभरातील प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरु केलेत. काँग्रेसला सोबत ठेवण्यात आता काही अर्थ नाही. कारण, आता पहिली काँग्रेस राहिलेली नाही. भाजपचा सामना करण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
‘काँग्रेसची विश्वासार्हता संपली’
काँग्रेसला सर्व ठिकाणी पराभव पत्करावा लागत आहे. आता काँग्रेसला जिंकण्याची इच्छा आहे असं वाटत नाही. त्यांची विश्वासार्हता संपलीय. त्यामुळे आता काँग्रेसवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
अधीर रंजन चौधरी
चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत पागल व्यक्तीला उत्तर देणं योग्य ठरत नाही. संपूर्ण देशात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. दीदींकडे काय आहे? काँग्रेसकडे विरोधकांच्या एकूण वोट शेअर पैकी 20 टक्के आहे. त्यांच्याकडे काय आहे? काँग्रेस नसती तर त्यांच्यासारखे नेतेही नसते अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ममता बॅनर्जी या भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचा एजंट म्हणून काम करण्यासाठी असं बोलत आहेत. तसंच सातत्याने चर्चेत राहण्यासाठी त्या अशी वक्तव्य करत असल्याची टीकाही चौधरी यांनी केलीय. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी काँग्रेस विरोधात का बोलत आहेत? काँग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारखे लोकही नसते. त्या भाजपला खूश करण्यासाठीच गोव्यात गेल्या. त्यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी मेहनत घेतली. ममता दीदींनीच गोव्यात काँग्रेसला कमकुवत केलं आणि हे सर्वजण जाणतात, असा आरोपही चौधरी यांनी केलाय.