काही तासांतच समजणार जनतेचा कौल …गल्ली ते दिल्ली सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये कोण होणार मुख्यमंत्री ?
पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जनेतेने नेमका कोणाला कौल दिला आहे हे आता अवघ्या काही तासातच एक्झिट पोलद्वारे समजणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणुका होताच वेध लागतात ते निकालाचे मात्र निकलापूर्वी कोण विजयी होणार आणि सत्ता कोणत्या पक्षाच्या हातात जाणार यासंबंधी जो एक अंदाज बांधण्यात येतो तो म्हणजे एक्झिट पोल.मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर आलेल्या मतदाराशी बोलून एक्झिट पोल तयार केला जातो. मतदाराला विचारले जाते की त्याने कोणाला मतदान केले. प्रत्येक मोठ्या निवडणुकीत, अनेक एजन्सी आणि मीडिया हाऊस त्यांच्या स्वत:चा एक्झिट पोल डेटा जारी करतात.EXIT POLLS: Exit polls for all five states will be announced today… Results on March 10… Find out the details…
अनेकांचे अंदाज खरे होतात, अनेकांचे चुकतात. अशाच प्रकारे जनतेचा कौल जाणून घेत निवडणुकांच्या पूर्वी पोल घेत कल जाणून घेतले जातात. यात दोन प्रकारचे पोल असतात. एक म्हणजे ओपिनियन पोल आणि दुसरा म्हणजे एक्झिट पोल.
निवडणूक आयोगाने निश्चित केलेली मुदत संपेपर्यंत कोणत्याही निवडणुकीदरम्यान एक्झिट पोल जारी करता येत नाहीत. मतदारांच्या मतावर परिणाम होऊ नये म्हणून यासाठी अशा प्रकारची बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे आज मतदान संपल्यावर एक्झिट पोल समोर येतील.
यावेळी निवडणूक आयोगाने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली होती .त्यामुळे आता 6.30 नंतर अनेक माध्यमांतून एक्झिट पोल सादर केले जातील .
या एक्झिट पोल मधून पाचही राज्यातील जनतेने निवडणुकीत नेमका कौल कोणाला दिला आहे याचा एक सरासरी अंदाज समोर येईल.
पाच राज्यापैकी चार राज्याच्या निवडणुका या पार पडल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमधीसल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज (7 मार्च) संपणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. अशा स्थितीत आता मतदानादरम्यान सर्वच राज्याचा नेमका एक्झिट पोल काय असणार याकडेच आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोण तयार करत एक्झिट पोल?
एक्झिट पोल वृत्तवाहिन्या किंवा सर्वेक्षण संस्थांद्वारे घेतले जातात. मतदारांच्या मताच्या आधारे तयार केले जातात.
10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाज आणि निकाल मांडायला सुरुवात केली आहे.