नाशिक : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्याचे राजकीय फळ लवकरच मिळणार असून शिवसेनेचा संयुक्त पुरोगामी आघाडीत अर्थात यूपीएमध्ये प्रवेश लवकरच होणार आहे, अशी माहिती अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने आयबीएन लोकमतने दिली आहे. Excerpt of UPA entry from Shiv Sena MPs-MLAs, party leaders on Khadkhadi
परंतु यामध्ये महत्त्वाचा प्रश्न, शिवसेनेत सध्या एकापाठोपाठ एक आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी जी प्रचंड खदखद व्यक्त करत आहेत, त्या खदखदीला यूपीए प्रवेशाचा उतारा शिवसेना नेतृत्वाने शोधून काढला आहे का…??, असा विचारला जातो आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक असेल तर युपीए प्रवेशाने शिवसेनेचे संघटनात्मक प्रश्न सुटणार आहेत का? आणि शिवसेनेतील आमदार-खासदारांची अस्वस्थता दूर होणार आहे का? हे प्रश्न आता विविध जिल्हा शहर स्थानिक पातळीवर अनेक शिवसैनिक विचारताना दिसत आहेत.
शिवसेना नेतृत्वाचा राजकीय पंगा भाजपच्या नेतृत्वाची आहे पण शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा आमदार-खासदारांचा खरा राजकीय संघर्ष जिल्हा शहर पातळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे याबद्दल शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. महाविकासआघाडी मध्ये राहून शिवसेनेचे शंभर टक्के नुकसान झाले असे वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी उघडपणे केले आहे.
एवढेच नाही तर हेमंत पाटलांचे आधी माजी खासदार अनंत गीते, प्रताप सरनाईक, अजय चौधरी, कोकणातले नेते रामदास कदम यांच्यासह शिवसेनेच्या किमान दहा ते बारा आमदारांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेना आमदारांच्या बाबत निधी देताना दुजाभाव करतात अशा तक्रारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत केल्या आहेत. मात्र या तक्रारींवर कोणतेही परिणाम कारक उत्तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिल्याच्या बातम्या कोठे आलेल्या नाहीत.
परंतु, दरम्यानच्या काळात खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्याच वेळी शिवसेनेच्या युपीए प्रवेशाबद्दल मोठ्या प्रमाणावर राजकीय अटकळी बांधण्यात आल्या. आता त्याचे उत्तर मिळाले असे बातमीत म्हटले आहे. सन 2022 जानेवारीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या अध्यक्ष यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या यूपीए प्रवेशाचा सोहळा होईल, असे शिवसेनेतील सूत्रांच्या हवाल्याने नमूद करण्यात आले आहे.
परंतु या सर्व प्रकारात शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतच राहिल्यामुळे अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात त्यांच्या मनामध्ये खदखद आहे. या नेत्यांचे शिवसेनेच्या यूपीए प्रवेशातून समाधान होणार का? किंवा त्यांची निधी न मिळण्याची किंवा निधी अडवला जाण्याची मुख्य तक्रार दूर होणार का? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत…!!