• Download App
    घरातील फ्रीजचे कार्य नेमके चालते कसे| Exactly how the home fridge works

    विज्ञानाचे डेस्टीनेशन : घरातील फ्रीजचे कार्य नेमके चालते कसे

    आता प्रत्येकाचा घरी रेफ्रीजरेटर म्हणजेच फ्रीज हा असतोच. अन्नपदार्थ ठेवण्यासाठीचे हे शीतकपाट आता काही चौनीचा बाब राहिलेले नाही. मात्र आपणास या फ्रीजचे कार्य नेमके कसे चालते याची फारशी माहिती नसते. रेफ्रिजरेटमध्ये कॉम्प्रेसर हा सर्वांत महत्वाचा घटक मानला जातो. तसेच उष्णतेची देवाणघेवाण करणाऱ्या कपाटाबाहेरील संघनन नलिका आणि उष्णतेची देवाणघेवाण करणाऱ्या कपाटातील बाष्पीभवन तसेच गार करणारे द्रव फार महत्वाचे असते.Exactly how the home fridge works

    सगळ्यात प्रथम आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की, ही सर्व यंत्रणा एकदा द्रव भरून बंद केली की तिच्यात कुठेही गळतीची शक्यता नसते. त्यामुळे सतत तोच द्रव पुन्हा पुन्हा वापरला जातो आणि आत बसवलेल्या नियंत्रकाकडून ती यंत्रणा स्वयंचलितपणे चालत राहते. प्रथम कॉम्प्रेसर त्याच्यात असलेल्या यंत्रणेतील वायूवरील दाब वाढवतो. त्यामुळे वायूचे तापमान वाढते. फ्रीजच्या मागील बाजूस असलेल्या नलिकांमधून उच्च दाबाचा हा गरम वायू बाहेरील वातावरणात उष्णता प्रसारित करत वर जातो.

    उष्णता बाहेर गेल्यामुळे त्या वायूचे रूपांतर उच्च दाबातील द्रवात होते. याच प्रक्रियेला संघनन म्हणतात. हे उच्च दाबातील द्रव विस्तारक झडपेमधून पुढे ढकलला जाते. झडपेच्या पलीकडील कमी दाबाच्या भागात प्रवेश केल्याबरोबर या द्रवावरील दाब कमी होतो. ही झडप म्हणजे एक छिद्र असते, ज्याच्या एका बाजूला उच्च दाबाचा द्रव असतो, तर दुसऱ्या बाजूला कमी दाबाचा. कमी दाबाचा गार करणारा द्रव म्हणजेच सीएफसी या भागात उकळू लागतो आणि त्याचे वायूत रूपांतर होऊ लागते.

    सीएफसी उणे २९.८ अंश सेल्सिअस या तापमानाला उकळते. त्यामुळे ते कपाटाच्या आतील भागातील उष्णता शोषून घेते आणि आतील भाग गार करते. याच प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. या प्रक्रियेत तयार झालेला वायू कॉम्प्रेसर ओढून घेतो आणि हे चक्र सुरू राहते. ही सर्व यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित असते. शीतकपाटाच्या आतील भागात बसवलेला एक तापमान संवेदक याचे नियंत्रण करण्यात मोठी भूमिका बजावतो.

    हा संवेदक कपाटाच्या आतील भागातील हवेच्या तापमानानुसार कॉम्प्रेसरकडे संदेश प्रक्षेपित करून त्याला थांबवतो किंवा सुरू करतो. आधुनिक शीतकपाटांमध्ये अनेक नवीन सुविधा दिसतात; ज्यामुळे उदाहरणार्थ, आतील सर्व भागांत समान गारवा मिळवता येतो.

    Exactly how the home fridge works

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!