• Download App
    शरीराला ड जीवनसत्व नेमके लागते किती|Exactly how much vitamin D the body needs

    विज्ञानाची गुपिते : शरीराला ड जीवनसत्व नेमके लागते किती

    उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्वचा उजळ करण्याचे दावे करणारी क्रीम्स, सनस्क्रीनमधील रसायने त्वचेच्या आत ऊन जाऊ देत नाहीत. कितीही माइल्ड क्रीम असलं तरी ते अतिनील ब किरणांना त्वचेच्या आतल्या भागापर्यंत पोचू देत नाही.Exactly how much vitamin D the body needs

    आपल्या शरीरात एक मिलिलिटर रक्तात ५० ते ७० नॅनोग्राम इतक्या प्रमाणात ड जीवनसत्त्व असावंच लागतं. इतकंसं ड जीवनसत्त्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ३००० जनुकांना कार्यरत ठेवतं. ही जनुकं कार्यरत राहिली नाहीत तर शरीरात अनेक व्याधी आणि आजार निर्माण होऊ शकतात. ड जीवनसत्त्वाअभावी ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडांमध्ये पोकळ्या वाढतात. पुढे मन दडपलेले असणे, मधूमेह, लठ्ठपणा, सोरायसीस, दुभंगलेली मनोवस्था, स्तनाचा, गर्भाशयाचा, प्रोस्टेटचा कर्करोग अशा अनेक विकारांची पायाभरणी होऊ शकते.

    त्यामुळे शरीराला ड जीवनसत्वाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यायलाच पाहिजे. सकाळच्या उन्हात फिरण्याला आपण सूर्यस्नान म्हणू. सूर्यस्नानात तयार झालेले ड जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू नंतर यकृतात जातात. तिथे त्यांचे रेणू थोडे पक्के होतात. त्यानंतर ते मूत्रपिंडाकडे नेले जातात. तिथे त्यांचे पक्के ड जीवनसत्त्व होते. त्यालाच डॉक्टरी भाषेत कोलेकॅल्सिफेरॉल म्हणतात.

    या प्रक्रियेला ४८ तास लागतात. ड जीवनसत्त्व मूत्रपिंडात तयार झालं की, त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य सुरू होते. ते म्हणजे शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणार्याू कॅल्शिअमला पकडून परत शरीरात कार्यरत करणे. आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर शरीर हाडातून-दातातून हाडं पोखरून कॅल्शिअम काढून घेतं. पोखरलेली हाडं ठिसूळ बनतात. अशी हाडं मोडण्याची शक्यता वाढते.

    Exactly how much vitamin D the body needs

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!