• Download App
    New Director of CBI : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती

    New Director of CBI : पोलीस-स्पाय-ऑल राऊंडर महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती

    ‎वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या महासंचालकपदावर वर्णी लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयचे प्रमुखपद हे रिक्त होते अखेर त्या जागेवर सुबोधकुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.दोन वर्षांसाठी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या बैठकीनंतर जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.Ex Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal appointed as CBI Chief

    सुबोधकुमार जयस्वाल हे  1985 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे नाव सीबीआय महासंचालक पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल 90 मिनिटे ही मिटिंग चालली. यावेळी रमन्ना यांनी एका महत्त्वाच्या नियमाचा हवाला देऊन या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली होती.

    कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

    सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

    त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.

    RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली

    सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता

    सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.

    मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.

    जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.

    Ex Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal appointed as CBI Chief

    Related posts

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची