• Download App
    डिसेंबरपर्यंत प्रत्येकाला लसीचा डोस देणार ; लसीकरणाबाबत केंद्राची उच्च न्यायालयात हमी Everyone will be vaccinated by December; Centre's guarantee in the High Court regarding vaccination

    डिसेंबरपर्यंत प्रत्येकाला लसीचा डोस देणार ; लसीकरणाबाबत केंद्राची उच्च न्यायालयात हमी

    वृत्तसंस्था

    मुंबई : या वर्षी डिसेंबर अखेर भारतातील प्रत्येकाला कोरोनाविरोधी लस दिली जाईल आणि लसीकरण पूर्ण केले जाईल,अशी हमी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. Everyone will be vaccinated by December; Centre’s guarantee in the High Court regarding vaccination

    75 वर्षांवरील ज्येष्ठ व अंथरुणाला खिळलेल्या विकलांग नागरिकांचे घरोघरी लसीकरण करावे, या मागणीची जनहित याचिका अॅड. धृती कपाडिया यांनी अॅड. अर्शिल शहा यांच्यामार्फत दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

    कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जुलै महिन्यात कोव्हॅक्सिनच्या साडेपाच कोटी तर कोविशिल्डच्या दोन कोटी लस उपलब्ध होतील. तसेच प्रत्येक नागरिकाचे डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण केले जाईल, अशी हमी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात दिली. दरम्यान, मुख्य न्यायमूर्तींनी केंद्र सरकारला यासंदर्भात सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश दिले.



    मुंबई मॉडेलचे अनुकरण करा

    महापालिकेच्या मुंबई मॉडेलचे न्यायालयाने पुन्हा काैतुक केले. हे मॉडेल फारच प्रभावी असल्याने ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिकांनीही त्याचे अनुकरण करायला हवे, असे न्यायमूर्ती म्हणाले.

    Everyone will be vaccinated by December; Centre’s guarantee in the High Court regarding vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…