तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणिस संदीप देशपांडे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Everyone knows who is partying where Sandeep Deshpande targets Aditya Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणिस संदीप देशपांडे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Everyone knows who is partying where Sandeep Deshpande targets Aditya Thackeray
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या रात्रीच्या संचारबंदीवर मनसेने टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्युचे कारण काय आहे? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
Everyone knows who is partying where Sandeep Deshpande targets Aditya Thackeray
देशपांडे म्हणाले की, तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी ‘कोरो’ना. लॉकडाउनमुळे यावर्षी लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर मग अमेरिकेसारखे पॅकेजही द्या.