Friday, 2 May 2025
  • Download App
    हर तस्वीर कुछ कहती है ! दिल्लीत आजी-माजी-भावी एकत्र ; जेवणाच्या टेबलवर ठाकरे-शाह एकमेकांच्या बाजूला ;चर्चा तर होणारच...Every picture says something! ex-future together in Delhi; Thackeray-Shah next to each other at the dinner table

    हर तस्वीर कुछ कहती है ! दिल्लीत आजी-माजी-भावी एकत्र ; जेवणाच्या टेबलवर ठाकरे-शाह एकमेकांच्या बाजूला ;चर्चा तर होणारच…

    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. 

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भोजन घेतलं. यावेळी आजी, माजी आणि भावी असं चित्रं पाहायला मिळालं.दोघेही बाजुला बसूूून जेवत असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Every picture says something! ex-future together in Delhi; Thackeray-Shah next to each other at the dinner table

    केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. या बैठकीत नक्षली कारवाया रोखण्यापासून ते नक्षली भागात करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जेवणही घेतलं. त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.

     

    अमित शहा मुख्यमंत्र्यासोबत भोजनाचा अस्वाद घेत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच नेते आहेत. अमित शहा, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बसलेले आहेत. शहा यांच्या उजव्या हातालाच लागून उद्धव ठाकरे बसले आहेत. तर डाव्या हाताला लागून चौहान बसले आहेत. नितीश कुमार समोरच बसले आहेत. या फोटोत शिवराजसिंह चौहान उद्धव ठाकरेंनकेड पाहून काही तरी बोलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेही चौहान यांचं म्हणणं मन लावून ऐकताना दिसत असून शहाही चौहान यांचं बोलणं गांभीर्याने ऐकताना दिसत आहेत. या नेत्यांमध्ये नेमकी चर्चा कशावर सुरू आहे हे नेमकं समजू शकलं नाही. मात्र, या नेत्यांमध्ये नक्षलवादी कारवायांवरच चर्चा सुरू असावी असा कयास वर्तविला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यावरही यावेळी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

    आजी, माजी, भावी

    विशेष म्हणजे या पाच नेत्यांपैकी तिन्ही नेते आजी, माजी सहकारी आहेत. उद्धव ठाकरे हे अमित शहांचे माजी सहकारी आहेत. तर नितीश कुमार आजी सहकारी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे भावी सहकारी होणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

     

    Every picture says something! ex-future together in Delhi; Thackeray-Shah next to each other at the dinner table

     

     

    Related posts

    Army-Air Force : ध्रुव हेलिकॉप्टरला HAL कडून ऑपरेशनल मंजुरी; लष्कर-हवाई दलाला विमान उड्डाणाची परवानगी

    Supreme Court : पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही; सुप्रीम कोर्टाने म्हटले- अशा याचिकांमुळे सुरक्षा दलांचे मनोबल कमी होते

    Pahalgam attack: : INS सुरत हाजिरा बंदरावर तैनात; अरबी समुद्रात अँटी शिप-अँटी एयरक्राफ्ट फायरिंगचा सराव