Monday, 28 April 2025
  • Download App
    चक्क संगणकही शिकणार आता माणसाची भाषा |Even computers will learn human language now

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क संगणकही शिकणार आता माणसाची भाषा

    कॉम्युटर अर्थात संगणकाने सध्या सारे मानवी जीवन व्यापले आहे. त्याच्या मदतीशिवाय सध्या पानही हलत नाही असी स्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर संगणकाचा मोठा प्रभाव आहे. तो त्याला दिसत नसला तरी तो आहे. तुम्ही संगणक थेटपणे वापरा किंवा वापरू नका तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांमध्ये त्याचा वापर कोठे ना कोठे होत असतोच. अशा या संगणकाला अधिकाधिक बुद्धिमान बनवण्याचे संशोधकांचे प्रयत्न सतत सुरू आहेत. आता संगणकाला चक्क माणसाची भाषा शिकवण्याचे नवे तंत्रज्ञान तयार झाले आहे.Even computers will learn human language now

    त्यामुळे संगणकही लवकरच माणसाची भाषा शिकू शकेल अशी आशा आहे. संगणकात अनेक भाषा अस्तित्वात आहेत. मात्र संगणकाला भाषा शिकवण्यासाठी भाषातज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ गेल्या ५० वर्षापासून अथक परिश्रम करीत आहेत. यासाठी आवश्यक ते साफ्टवेअर तयार केले जात आहे. याचा प्रयोग सध्या टेक्सास विद्यापीठात सुरू आहे.

    तेथील संशोधकांनी संगणकाने नैसर्गिकरीत्या भाषा शिकावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. माणूस हा भाषा बोलताना तर्काचा वापर करतो. हे संगणकाला शक्य नसल्याने अन्य पर्याय शोधून काढले जात आहेत. एका शब्दाचे अनेक अर्थ होत असतात. त्यामुळे संगणकाला त्याची मानवाप्रमाणे कल्पना करायला शिकवणे मोठे आव्हान आहे. या संगणकात जगभरातील विविध भाषांतील तब्बल १०० दशलक्ष शब्दांचे संकलन करण्यात आलेले आहे. यासाठी संशोधकांनी हाडूप नावाचे साफ्टवेअर तयार केले आहे.

    याचा वापर करून शाब्दिक विश्लेषण करता येते असे संशोधकांनी सांगितले. या प्रयत्नांना सध् यश मिळत अशून काही काळातच स्मार्ट संगणक स्वतः भाषा ओळखतील अशी संशोधकांना खात्री आहे. सध्याप्रमाणेच यापुढेही माणूस हा संगणकावर जास्तीत जास्त अवलंबून राहणार आहे. अशा वेळी या संगणकाला मानवी चेहरा दणे ही काळाची गरज राहणार आहे. त्यासाठी हे जे काही संशोधन सुरु आहे त्याचा मानवाला नक्कीच फायदा होणार आहे यात शंका नाही.

    Even computers will learn human language now

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!

    जम्मू – काश्मीरचा सिंधूच्या पाण्यावरचा हक्क मारून नेहरूंनी पाकिस्तानशी केला सिंधू जल करार!!

    जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!