• Download App
    स्वतःचेही योग्य मूल्यमापन करा Evaluate yourself properly

    स्वतःचेही योग्य मूल्यमापन करा

    केवळ कल्पनेत रमणे महत्वाचे नाही तर स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. तुम्हाला तुमचे शरीर तरी पूर्णपणे माहीत आहे का? तुम्ही समोरच्याचे शारीरिक अस्तित्व पाहता, पण स्वतःच्याच शरीराचा, श्वा साचा, मन आणि भावनांचा अनुभव कधी घेतलाय का? Evaluate yourself properly

    मन आणि शरीर पूर्णपणे विरोधी नियमांवर चालते. मनाच्या बाबतीत सहजता ही गुरुकिल्ली आहे. तुम्ही प्रयत्नाने काही आठवू शकत नाही, तर तुम्ही शिथिल असता तेव्हा स्मरणशक्ती, सर्जनशीलता, बुद्धिमत्ता परतते.

    मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणून कार्यरत असणारी जाणीवसुद्धा हीच होय. तुम्हाला स्मरणशक्ती नकारात्मक गोष्टींना चिकटून राहात असल्याचे दिसेल. तुम्ही इतरांचे दहा वेळा केलेले कौतुक विसराल, मात्र एक वेळचा अपमान लक्षात ठेवाल. हे नेमके उलट करायला हवे. नकारात्मकतेला चिकटून राहण्याच्या या वृत्तीकडून सकारात्मकतेचा प्रवास मोलाचा असतो.

    नातेसंबंध निकोप राखण्यासाठी तुमचे पहिल्यांदा स्वतःबरोबर नाते सुदृढ असायला हवे. स्वतःबरोबर असे नाते नसल्यास एकात्मतेचा अभाव म्हणतात. दुसरे म्हणजे, अनौपचारिकतेतून तुमचे आंतरवैयक्तिक नाते सशक्त होते, कारण ते चुकांची मुभा देते. तुम्ही कोणत्याही नातेसंबंधांमध्ये परिपूर्णतेचा आग्रह धरू शकत नाहीत. आजच्या जगाची सर्वांत मोठी समस्या म्हणजे भावनिक अस्थिरता होय. तुम्ही तुमच्याभोवती अनौपचारिक आणि सौहार्दाचे वातावरण तयार करता तेव्हा स्वतःभोवती घडणाऱ्या घडामोंडींमुळे असहाय होत नाही.

    खरेतर, आयुष्यात असे एकच तयार सूत्र नाही. तुम्ही स्वत:ला अतिशय प्रामाणिक समजता तेव्हा आतमधून नकळत थोडेसे कठोर बनता. इतरांकडे बोट दाखवता तेव्हा असहिष्णू बनता. तुम्ही स्वतःमधील दोष ओळखता तेव्हाच इतरांचे दोष सामावून घेऊ शकता. मतभेद सुरू झाल्यावर नातेसंबंध विस्कळित होतात. अशावेळी तुम्ही जरा स्वतःकडे पाहा. तुम्ही नेहमी स्वतःशी तरी सहमत असता का. काल तुमच्या काही कल्पना होत्या, आज त्या वेगळ्या असू शकतात. पाच वर्षांपूर्वी आणखी वेगळ्या होत्या. म्हणजेच, तुमचे स्वतःबद्दलच मतभेद असतील, तर ते इतरांबरोबर का घडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतःचे विचार किंवा भावनिक आकृतिबंधाकडे पाहणे आवश्येक ठरते.

    Evaluate yourself properly

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!