• Download App
    इंजिनिअर दाम्पत्यांचा नऊ दिवसांत घटस्फोट Engineer couple divorced in nine days, pune family court order to both parties

    इंजिनिअर दाम्पत्यांचा नऊ दिवसांत घटस्फोट

    स्वभावातील तफावतीमुळे दीड वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या इंजिनिअर उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या नऊ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मंजूर केला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -स्वभावातील तफावतीमुळे दीड वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या इंजिनिअर उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या नऊ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मंजूर केला आहे. Engineer couple divorced in nine days, pune family court order to both parties

    सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
    दोघांनी ऍड. विजयकुमार बिराजदार, ऍड. ऋषिकेश खंडेलवाल, ऍड. नंदकिशोर येरंडे आणि ऍड. हर्ष खंडेलवाल यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही इंजिनिअर आहेत. पुण्यात नोकरी करतात त्यांना मुलबाळ नाही. राहुल आणि सुनिता (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. जानेवारी 2020 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. अवघ्या काही दिवसाच्या संसारानंतर दोघे वेगळे राहत होते. न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. निकालानुसार दोघांत कोणतेही देवाण-घेवाण नाही.

    दोघेही इंजिनिअर आहेत. कमविते आहेत. दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत. आता एकत्र येणे शक्‍य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार आहेत. त्यामुळे दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे दोघांच्या वेळेची बचत झाली आहे. ते स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
    -ऍड. विजयकुमार बिराजदार, अर्जदारांच्या वकील.

    Engineer couple divorced in nine days, pune family court order to both parties

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…