प्रतिनिधी
नवी मुंबई : महावितरण तर्फे वाशी येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. गो ग्रीन इलेक्ट्रिक कॅम्पेन च्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसारासाठी या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.Electric vehicles Road show in Navi Mumbai
सध्या वाढत चाललेले प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे आपला कल वाढवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. इलेक्ट्रिक कार, बाईक, टेम्पो, रिक्षा तसेच बसेस देखील या इलेक्ट्रिक वाहन रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या.
इलेक्ट्रिक वाहनांची वैशिष्ट्ये नागरिकांपर्यंत पोहचावीत या दृष्टीने या रोड शो चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना आपली पसंती द्यावी असे आवाहन प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्फत करण्यात आले.
- इलेक्ट्रिक वाहनांचा नवी मुंबईत रोड शो
- इलेक्ट्रिक कार, बाईक, टेम्पो, रिक्षा, बस सहभागी
- महावितरणतर्फे इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार
- प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन उपयुक्त