पहिले होते नाथ
आता झाले दास
कोण कुणाला नादी लावून
सेनेची लावतोय वाट?
जनतेच्याही मनात नसता
बसला खुर्चीवरी
हातात घेऊन हात
बांधले घड्याळ मनगटावरी
बापाचा तो मंत्र असे
ध्यानी धरसी जरी
काकाशी संधान नको ते
फास बसे तो गळी
परी सेनेचा खेळ तो होई
अडीच वर्षांतरी
काका वरती विसंबला तो
मातीस मिळतो परी
(व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर )
(आधी होते नाथ आता झाले दास, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून काढले त्यावर आधारित)