विशेष प्रतिनिधी
सोलापूर – केवळ १८ महिन्यांची मुलगी उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले आहे.
उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसुबाईचा अवघड शिखर सर केल आहे.
सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पहाटे शिखर सर करून तिरंगा शिखरावर फडकवला आहे. उर्वी आणि तिच्या आईने २१ व्या शतकात या कर्तृत्वामुळे हिरकणीची आठवण करून दिली आहे.
- उर्वी प्रितेश गांधीने आईसोबत सर केले कळसुबाई
- उर्वी आणि तिची आई श्रुती यांची कामगिरी
- अवघ्या साडेतीन तासांत मोहीम फत्ते
- तिरंगा शिखरावर फडकवला
- कर्तृत्वामुळे आली हिरकणीची आठवण