• Download App
    BYJUच्या 3 ठिकाणी EDचे छापे, कंपनीला 2011 पासून 28 हजार कोटींचा मिळाला FDI, ऑडिटही केले नाहीED raids at 3 locations of BYJU, company received 28 thousand crores FDI since 2011, not even audited

    BYJUच्या 3 ठिकाणी EDचे छापे, कंपनीला 2011 पासून 28 हजार कोटींचा मिळाला FDI, ऑडिटही केले नाही

    प्रतिनिधी

    बंगळुरू : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्या बंगळुरूतील तीन ठिकाणी धाड टाकली आहे. ईडी ही कारवाई फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) च्या तरतुदींनुसार केली आहे. बायजू रवींद्रन आणि त्यांची कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत. ED raids at 3 locations of BYJU, company received 28 thousand crores FDI since 2011, not even audited

    आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त

    एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अधिकार्‍यांनी झडतीदरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला आहे. चौकशी एजन्सीनुसार, कंपनीला 2011 ते 2023 दरम्यान 28,000 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. याशिवाय कंपनीने एफडीआयच्या नावाने विविध देशांना पैसेही पाठवले.


    पीएम मोदींचा सपावर निशाणा : म्हणाले – यूपीमध्ये माफी मागत फिरताहेत माफिया, माफियांना होतोय त्रास!


    कंपनीचा जाहिरातींवर तब्ब्ल 944 कोटी रुपयांचा खर्च

    ईडीच्या म्हणण्यानुसार, Byju’s नावाने एडटेक प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या Think and Learn Pvt Ltd ने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली सुमारे 944 कोटी रुपये खर्च केले होते. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 पासून आपले आर्थिक विवरण तयार केले नाही आणि खात्यांचे लेखापरीक्षण केले नाही. त्यामुळे त्याचा तपास सुरू आहे.

    बायजू रवींद्रन यांना समन्स बजावले, पण कधीही हजर झाले नाहीत

    काही लोकांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. याशिवाय रवींद्रन यांच्या नावाने अनेक समन्स जारी केल्याचा आरोप आहे, परंतु ते ईडीला टाळत राहिले, ते कधीही हजर झाले नाहीत.

    ED raids at 3 locations of BYJU, company received 28 thousand crores FDI since 2011, not even audited

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!