• Download App
    झंवर प्रकरणी नवे वळण,चौकशीसाठी ईडीची यंत्रणा नाशिकला,फार्महाऊस कंपन्या रडारवर | The Focus India

    झंवर प्रकरणी नवे वळण,चौकशीसाठी ईडीची यंत्रणा नाशिकला,फार्महाऊस कंपन्या रडारवर

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनिल झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी कनेक्शन असल्याने सातपूर,अंबडमधील कंपन्यांच्या कागदपत्र गहाळ प्रकरणांशी झंवर यांचे नाव जोडले जात आहे. हेच लक्षात घेऊन चौकशीसाठी ईडीचे अधिकारी नाशिकला आले असून सध्या धाड टाकत चौकशीसत्र सुरू आहे. ed raid news

    झंवर यांच्या चौकशीसाठी यंत्रणा नाशिकला

    झंवर यांच्याशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी सातपूर-अंबडमधील अचानक काही कंपन्यांची मूळ खरेदी कागदपत्रे चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपन्यांचे खरेदी कागदपत्र गहाळ प्रकरणातील गौडबंगाल शोधून त्यांचे कनेक्शन तपासले जावे, अशी मागणी सातपूर-अंबड औद्योगिक परिसरात सुरु आहे. ed raid news

    कंपनी कागदपत्र गहाळ प्रकरणाशी झंवर कनेक्शन? संशयित झंवरचे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील भूखंडाचे व्यवहार,कंपन्याच्या खरेदी प्रकरणातील गहाळ कागदपत्र प्रकरण अशा नानाविध प्रकरणांशी नाव जोडले जात आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी हे सावध झाले असून वेगवेगळ्या प्रकारे माहिती सध्या गोळा करत आहे.

    ed raid news

    पुणे आणि जळगाव पोलिसही स्वतंत्रपणे शोध घेत आहे. जळगाव येथील सुनिल झंवर यांच्यासह अन्य काही व्यवसायिकांना बीएचआर सोसायटी प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने रडारवर घेतले आहे. अवसायकास हाताशी धरून गैरप्रकार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चौघांना अटक झाली असून सहा जण फरारी आहेत. झंवर व त्यांचे भागीदार बोरा तसेच पक्षाच्या काही व्यक्तींची चौकशी अपेक्षित आहे.

    फार्महाऊस कंपन्या रडारवर

    ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये कंपन्यांसोबत इगतपुरी घोटी,त्र्यंबकेश्वर,गंगापूर, दरी,मातोरी भागातील फार्महाऊसचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून अजून काय काय माहिती पुढे येते, याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…