• Download App
    द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती : एनडीए : पास वो आने लगे जरा जरा; विरोधी विकेट पडल्या धडा धडा!!|Drupadi Murmu for president : brings vajpeyee age NDA old partner parties together

    द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती : एनडीए : पास वो आने लगे जरा जरा; विरोधी विकेट पडल्या धडा धडा!!

    ओरिसातील भाजपच्या नेत्यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊन आदिवासी समुदायातील महिला नेत्याला प्रथम राष्ट्रपती पदाची संधी मिळवून दिली आहेच, पण त्या पलिकडे जाऊन वेगळे राजकारण पंतप्रधान मोदींनी साधल्याचे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक त्याला चपखल लागू होते. जे विरोधक केवळ नरेंद्र मोदींच्या नावामुळे भाजपपासून दूर गेले होते, ते सगळे विरोधक आता द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या पाठिंबाच्या निमित्ताने का होईना पण भाजपच्या जवळ यायला लागले आहेत. किंबहुना ती त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे.Drupadi Murmu for president : brings vajpeyee age NDA old partner parties together

    चंद्राबाबू नायडूंची तेलुगु देशम पार्टी, एच. डी. देवेगौडांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा, नवीन पटनायक यांचे बिजू जनता दल, प्रकाश सिंग बादल यांचे शिरोमणी अकाली दल आणि कदाचित उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे आता परत एकदा भाजपच्या जवळ आले आहेत. किंबहुना द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीमुळे त्यांना भाजपच्या जवळ यावे लागले आहे!!

    ज्या नरेंद्र मोदी यांना सर्व विरोधक वाजपेयी यांच्या काळातला सर्वसमावेशक भाजप आणि एनडीए संपवला अशी दूषणे देत होते तेच हे विरोधक द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने भाजपच्या जवळ आले आहेत आणि काही येऊ घातले आहेत. वाजपेयींच्या काळातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे न बोलता न सांगता पुनरुज्जीवन होत आहे.



    केवळ नरेंद्र मोदींच्या नावाला विरोध म्हणून चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टीने भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडली सोडली होती. पण आंध्र प्रदेशात असा काही फटका बसला की तेलगू देशम गेली 7 वर्षे सत्तेबाहेर आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर भाजपशी संबंध तोडले होते. पण प्रकाश सिंग बादल यांची राजकीय पुण्याई एवढी संपली की विधानसभा निवडणुकीत वयाच्या 94 वर्षे त्यांना पराभव पत्करावा लागला. मुलगा, सून सत्तेपासून दूर गेले. देवेगौरांचा जनता दल कर्नाटकात सत्तेबाहेर आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडतो आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजप शिवाय आपल्याला पर्याय नाही, याचा साक्षात्कार खासदारांना झाला आहे!! द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्याच्या निमित्ताने शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपच्या जवळ खेचून आणण्याचा खासदारांचा प्रयत्न आहे. आणि नेमके हेच एक प्रकारे वाजपेयींच्या काळातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे हे न बोलता, न सांगता पुनरुज्जीवन आहे!!

    परिणाम किती टिकेल?

    अर्थात याचा परिणाम 2024 पर्यंत किती राहील आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत किती साध्य होईल हा भाग वेगळा, पण यातला मुख्य घटक असा की जे पक्ष केवळ मोदींच्या नावाला विरोध म्हणून बाजूला गेले होते, ते पक्ष पुन्हा द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निमित्ताने भाजपशी पुन्हा जोडले जात आहेत. निदान तसे दिसत तरी आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची भली मोठी यादी पाहिली की याचे प्रत्यंतर येते.

     द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणारे पक्ष :

    1. भारतीय जनता पार्टी (भाजपा)

    2. जनता दल यूनाइटेड (जेडीयू)

    3. अखिल भारतीय अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम (एआईएडीएमके)

    4. बीजू जनता दल (बीजद)

    5. बहुजन समाज पार्टी (बसपा)

    6. युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (वाईएसआरसीपी)

    7. अपना दल सोनेलाल (एडीएस)

    8. राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (आरएलजेपी)

    9. असम गण परिषद (एजीपी)

    10. पट्टाली मक्कल काची (पीएमके)

    11. नागा पीपुल्स फ्रंट (एनपीएफ)

    12. नॅशनल पीपुल्स पार्टी (एनपीपी)

    13. जननायक जनता पार्टी (जेजेपी)

    14. यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल)

    15. मिजो नेशनल फ्रंट (एमएनएफ)

    16. निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल (निषाद)

    17. नेशनलिस्ट प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक पार्टी (एनडीपीपी)

    18. ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन (आजसू)

    19. लोक जनशक्ति पार्टी (रामविलास)

    20. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)

    21. जनता काँग्रेस छत्तीसगढ़ (जेसीसी)

    22. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम)

    23. हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम)

    24. बोडोलँड पीपुल्स फ्रंट (बीपीएफ)

    25. राष्ट्रीय समाज पक्ष (आरएएसपी)

    26. जन सेना पार्टी (जेएसपी)

    27. अखिल भारतीय नमथु राजियम काँग्रेस (एआईएनआरसी)

    28. हरियाणा लोकहित पार्टी (एचएलपी)

    29. यूनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी (यूडीपी)

    30. पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (पीडीएफ)

    31. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी (एमजीपी)

    32. हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (एचएसपीडीपी)

    33. कुकी पीपल्स एलायंस (केपीए)

    34. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठावले (आरपीआई-ए)

    35. तमिल मनीला काँग्रेस मूपनार (टीएमसी-एम)

    36. इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आईपीएफटी)

    37. पुरानी भारतम काची (पीबीके)

    38. शिरोमणि अकाली दल (शिअद)

    39. तेलुगु देशम पार्टी (तेदेपा)

    याखेरीज झारखंड मधली सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा भले काँग्रेस प्रणित यूपीएचा घटक पक्ष असो, पण झारखंड मुक्ती मोर्चा देखील आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मुर्मू यांनाच राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. त्या स्वतः मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांना भेटून आल्या आहेत. महाराष्ट्रात येऊन त्या भाजप आणि अन्य पक्षाच्या नेत्यांना भेटतीलच. पण त्या कदाचित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील भेटण्याची शक्यता आहे.

     ओरिसातील व्यक्तीला प्रथम संधी

    द्रौपदी मुर्मू या मूळ ओरिसाच्या आहेत. त्यामुळे अर्थातच ओरिसातील पहिली व्यक्ती राष्ट्रपती बनत असेल तर आपण मागे राहून चालणार नाही ही राजकीय अपरिहार्यता मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना देखील समजली आहे. त्यामुळे बिजू जनता दलाचा पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना मिळाला आहे.

    उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय??

    एक प्रकारे कधी ना कधी भाजप बरोबर राहिलेले हे सगळे घटक पक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांची उमेदवारी हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी साठी “सिमेंटिंग फोर्स” ठरताना दिसत आहे. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदासाठी निवड करून मोदींनी जसे एक वेगळे पाऊल उचलले आणि त्याचा परिणाम वाजपेयींच्या काळातल्या सर्व समावेशक एनडीएचे घटक पक्ष एकत्र येण्यात दिसला त्या पुढचे पाऊल ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत टाकतात का?? की आणखी काही वेगळा डाव करतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Drupadi Murmu for president : brings vajpeyee age NDA old partner parties together

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!