• Download App
    कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसीचे आता कॉकटेल, कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी; अभ्यासास परवानगी drugs controller general of india gives permission for study on covishield and covaxin mixing.

    कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसीचे आता कॉकटेल, कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी; अभ्यासास परवानगी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसीचे आता कॉकटेल करुन ती दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. म्हणजेच कोरोना विषाणूच्या कोणत्याही व्हेरिएंटवर ही मिश्र लस प्रभावी ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे लसीचे कॉकटेल करण्यास आणि अभ्यास करण्यास ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. drugs controller general of india gives permission for study on covishield and covaxin mixing.

    कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसी स्वतंत्र न देता यांचे योग्य प्रमाणात मिश्रण नागरिकांना टोचल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, असे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने आता पावले उचलली जात आहेत.

    जगातील काही मोठ्या देशांत दोन लसीचे मिश्रण करून लशीची ताकद अधिक वाढविण्याचे प्रयोगही सुरू झाले आहेत. आता भारतातही कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डचा मिश्र डोसचा अभ्यास करण्यात येणार आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अभ्यास आणि याचे क्लिनिकल ट्रायल वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या वतीने आयोजित केले जातील.

    सीडीएससीओच्या विषय तज्ज्ञ समितीने २९ जुलैला दोन्ही लसींच्या मिश्रणासाठी अभ्यासाची शिफारस केली होती. मात्र, हा अभ्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अभ्यासापेक्षा वेगळा असेल. ICMR च्या अभ्यासात दोन कोरोना लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले संरक्षण आणि रोगप्रतिकारक्षमता मिळते, असे म्हटले आहे.



    कोरोना व्हेरिएंट्सवरही परिणामकारक : ICMR

    आयसीएमआरच्या अभ्यासात आढळून आले आहे की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचा मिक्स डोस दिल्यास, केवळ कोरोना विरोधातच चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही, तर हे कोरोनाच्या व्हेरिएंट्सवरही परिणामकारक आहे. या अभ्यासात एकूण ९८ लोकांचा समावेश करण्यात आला होता. यांतील ४० लोकांना कोविशील्ड आणि ४० लोकांना कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस देण्यात आले होते आणि १८ लोक असे होते, ज्यांना पहिला डोस कोविशील्ड आणि दुसरा डोज कोव्हॅक्सीनचा दिला होता.

    ‘या’ देशांतही मिक्स व्हॅक्सीनचा फॉर्म्युला

    रशिया- रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने स्वतःला लस कॉकटेलमधील अव्वल म्हटले आहे. रशियाकडून Sputnik-V आणि AstraZenecaच्या डोसचे कॉकटेल तयार केले. यात कुठलेही मोठे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. या महिन्याच्या शेवटी यासंदर्भात अंतिम निकाल जाहीर होईल.

    डेन्मार्क- येथे करण्यात आलेल्या चाचणीत, अ‍ॅस्ट्राझेनेकाचा पहिला डोस दिल्यानंतर, दुसरा डोस फायझर अथवा मॉडर्ना लसीचा देण्यात आल्यास कोरोनापासून चांगल्या प्रकारचे संरक्षण होते.

    दक्षिण कोरिया – अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस आणि फायझरचा दुसरा डोस घेतल्यास, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या दोन्ही डोसच्या तुलनेत ६ पट अधिक चांगले संरक्षण मिळते.

    drugs controller general of india gives permission for study on covishield and covaxin mixing.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…