वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोना विरोधातील लढाईत देशाची संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओने अग्रेसर राहात DRDO Anti-COVID drug 2D या कोविड प्रतिबंधक औषधाची निर्मिती केली. आता त्याच्या पाठोपाठ डीआरडीओ मोठी हॉस्पिटल्स बांधणार असून हल्दवानी, ऋषिकेश, श्रीनगर, गांधीनगर, गुवाहाटीत प्रत्येकी ५०० बेड्सची सुविधा या हॉस्पिटलल्समध्ये असतील, अशी माहिती डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी दिली आहे. DRDo are also making 500-bed hospitals each in Haldwani & Rishikesh
डीआरडीओच्या योजनांविषयी सविस्तर माहिती त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली. DRDO Anti-COVID drug 2D या कोविड प्रतिबंधक औषधाची दुसरी खेप २७ मे रोजी येईल. ती मर्यादित स्वरूपात असेल. औषधाचे नियमित उत्पादन जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. त्यानंतर ते सर्वांसाठी मागणीनुसार उपलब्ध होईल. औषधाचे उत्पादन १ लाख सॅशेसपर्यंत वाढविण्याची क्षमता विकसित करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सतीश रेड्डी म्हणाले, की ५ शहरांमध्ये मोठी हॉस्पिटल्स तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. असून हल्दवानी, ऋषिकेश, श्रीनगर, गांधीनगर, गुवाहाटीत प्रत्येकी ५०० बेड्सची सुविधा या हॉस्पिटलल्समध्ये असतील. पीएम केअर फंडाने आमच्याकडे ५०० ऑक्सिजन प्लँट्स बनविण्याची ऑर्डर दिली होती. ती आता वाढवून ८४९ ऑक्सिजन प्लँट्सपर्यंत पोहोचवली आहे. आम्ही आमच्या उत्पादन पार्टनर कंपनीबरोबर निर्मिती क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा करीत आहोत. ही ऑर्डर वेळेत पूर्ण केली जाईल. सर्व हॉस्पिटल्सना जुलैअखेरपर्यंत ऑक्सिजन प्लँट्स पुरविले जातील.
-DRDO Anti-COVID drug 2D काम करते कसे…
DRDO Anti-COVID drug 2D हे औषध इन्फेक्टेड सेल्सवर काम करते. स्ट्रेन कोणता आहे, याच्याशी त्याचा संबंध नाही. इन्फेक्टेड सेल्स या मूळ स्ट्रेनसारख्याच शरीरावर परिणाम करतात. औषधाचा परिणाम होऊन एकतर त्या सेल्स निकामी बनतात याचा परिणाम शरीरावर अनुकूल होतो आणि पेशंट लवकर बरा होण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. सतीश रेड्डी यांनी दिली.