आपण मेहनत करून कमावलेले पैसे गरज नसताना उडवू नका. पैशांचा वायफळ खर्च केल्याने पैसे आपल्याकडे टिकत नाही आणि आपण कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. एखाद्याला पैसे कमावता येतात पण ते सारखे खर्च होत असतात.Don’t waste hard earned money when you don’t need it
अशाने कधीच आपल्याला यशस्वी होता येत नाही. त्यामुळे कष्टाने कमावलेले पैसे सांभाळता सुद्धा आले पाहिजेत. योग्य तऱ्हेने पैशांचा व्यवहार करता आला की लवकरच आपण सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. पैशांची योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आणि जोखीमेचा असतो.
/
पैशांची गुंतवणूक करणे हे जेवढे रिस्की असते तेवढेच लाभदायक सुद्धा असते. कमावलेले पैसे किंवा बचत केलेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले असता त्याचा नफा अधिक चांगला मिळतो. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे हे आर्थिकदृष्ट्या गरजेचे आहे. योग्य ते नियोजन करूनच पैशांची गुंतवणूक करावी.
गुंतवणुकीचे पर्याय प्रत्येकासाठी सारखे नसतात. आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम घेण्याच्या क्षमतेचा अशा विविध घटकांचा अभ्यास करून मगच गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्विमा योजना बँकेतील मुदत ठेवी भविष्य निर्वाह निधी, शेअर्स, म्युच्युअल फंड सोने-चांदी रिअल इस्टेट आदी विविध अशा अनेक गुंतवणूक साधनांतून आपण गुंतवणूक करू शकतो आणि बक्कळ पैसा कमावू शकतो.
पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर नक्कीच चांगला नफा आपल्याला मिळतो. त्या नफ्यामधून सुद्धा पुन्हा पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. गरज नसेल तर मिळणाऱ्या नफ्याची पुन्हा गुंतवणूक करा. रिअल इस्टेट मध्ये चांगला नफा मिळवायचा असेल तर आधीच जमिन घेऊन ठेवा. ज्यावेळी सर्व लोक जमिनी विकत असतात, त्यावेळी त्यांची किंमत कमी झालेली असते. अशावेळी त्या जमिनी घेऊन ठेवा. त्यांनतर योग्य वेळ आल्यावर त्या जमिनी विका. त्यातून तुम्हाला नक्कीच नफा वाढवून मिळेल.
Don’t waste hard earned money when you don’t need it