• Download App
    सतत तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नका, तल्लख मेंदूसाठी भरपूर खेळा Don’t rely on constant technology, play a lot for brilliant brainse%

    मेंदूचा शोध व बोध : सतत तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नका, तल्लख मेंदूसाठी भरपूर खेळा

    एखादा विशेष दिवस असो, तारीख असो किंवा काही महत्त्वाचे काम असो! आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही विसरतो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मग स्मार्टफोन्स किंवा गुगल येतेच मदतीला.Don’t rely on constant technology, play a lot for brilliant brains

    तंत्रज्ञानाच्या मदतीने या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे सहजसोपे झाले आहे; पण त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होत आहे. कारण, तंत्रज्ञानावर अवलंबून राहताना आपला मेंदू कमजोर होतोय.

    मेंदूची क्षमता कमी झाली की, त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो. अर्थात, काही खेळ आहेत जे खेळले तर मेंदू आजही मजबूत राहू शकतो. पूर्वी आपण एकमेकांना कोडी घालायचो, जी सोडवण्यासाठी आपल्याला फार विचार करावा लागत असे आणि तोच मेंदूला व्यायाम असे. मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोडे हा खेळ अत्यंत उपयुक्त आहे. कोडी अनेक प्रकारची असतात.

    जसे शब्दकोडे, सुडोकू, स्क्रॅबल, रुबिक क्यूबसारखे खेळ. अशा प्रकारची कोडी इंटरनेट, वर्तमानपत्रे, स्मार्टफोन्स आदींमध्ये मिळतील. हे खेळ अगदीच सहज सोपे वाटतात; पण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. खेळाची मज्जा आणि मेंदूची मशागत असे दोन्ही उद्देश त्यातून साध्य होतात.

    खेळताना मेंदूला चालना मिळते. कोड्याचे खेळ खेळल्याने स्मरणशक्ती चांगली होतेच, शिवाय आपली विचारशक्ती, समजशक्ती आणि निर्णयक्षमताही मजबूत होते. कोड्याचे खेळ खेळणे हा प्ले थेरेपीचा एक भाग आहे. मुलांना सुरुवातीपासून असे खेळ खेळण्याची सवय लावली, तर त्यांचा मानसिक विकास खूप उत्तम होतो. मुलांची विचारक्षमताही वेगाने विकसित होते.

    मुले अशा प्रकारचे खेळ खेळत राहिले तर त्यांची कल्पनाशक्ती वाढते. त्यामुळे मुलांना रंग, अक्षरे, आकार आणि संख्या आदी गोष्टी लक्षात ठेवणे शिकता येते. या खेळाचा एवढाच फायदा मुलांना होतो, असे नाही तर कोड्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये कौशल्य विकासाची क्षमताही वेगाने वाढते. एखादी वस्तू मुले पकडतात तेव्हा ती योग्य जागी लावण्याचा प्रयत्न करतात. या खेळामुळे त्यांच्यात नियोजनाची क्षमता वाढते.

    Don’t rely on constant technology, play a lot for brilliant brains

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!