आशावादी विचारांचे दोन शब्द जर एखाद्याला नवीन दृष्टीकोनातून विचार करण्यासाठी प्रेरित करत असतील तर हे शब्द मंत्रासमान असतात, दिव्याच्या प्रकाशासारखे असतात. तुमच्या तोंडून निघालेले आशावादी शब्दसुद्धा आनंद, यश आणि स्वास्थ्याचं कारण बनू शकतात. सकाळपासून रात्रीपर्यंत घरी, शेजारी, शाळेमध्ये, कॅलेजमध्ये, आफिसमध्ये, रस्त्यामध्ये किती तरी लोक तुमच्याशी बोलत असतात.Don’t constantly scold others
रस्त्यात जर दोन माणसे भेटली तर त्यांच्यात काय चर्चा होते? समोरचा आपल्या ऑफिसबद्दल बोलायला सुरूवात करतो. या माणसाने अशी चूक केली.. जाणूनबजून असं केलं. अशा प्रकारे तक्रार, चुगली आणि गॉसिपिंग चालू असतं. जागरूक नसाल तर तुम्हीही त्यामध्ये सामील होता. कारण जे नकारात्मक बोलणं चाललेलं आहे, त्यासंबंधीत काही गोष्टी तुम्हालाही आठवायला लागतात.
उदाहरणार्थ, अरे.. माझ्याबरोबरसुद्धा असचं होतं… माझा शेजारीही असाच माझ्याशी वागतो… खरंतर तुम्ही ती घटना विसरला होता, परंतु समोरच्यामुळे पुन्हा ती आठवण मनात ताजी होते. मग तुम्हीही तुम्हाला आलेले नकारात्मक अनुभव सांगायला सुरवात करता आणि अशाप्रकारे आपल्याच नकारात्मक गोष्टींच्या वाऱ्याने आपण आशेचा दीप विझवून टाकतो. अशा वेळी काय करायचे तर बोलण्यामध्ये सहभागी न होता काही सकारात्मक गोष्टी बोलायला सुरूवात करायची. भलेही मग ते शब्द छोटेसे का असेनात.
तुमचा हा प्रयत्न आशेचा दीप प्रज्वलित करण्यासाठी नक्कीच मदत करेल. तुमचा हा छोटासा प्रयत्न, थोडेसे शब्द, बोलणं हे एखादा दिवा प्रज्वलित केल्यासारखंच ठरेल. यशस्वी लोक नेहमी यशाची सकारात्मक भाषा करीत असतात नेहमी उद्याची भाषा करीत असतात. भूतकाळात व दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यात ते आजिबात रमत नाहीत. यात ते आपला वेळ खर्च करत नाहीत.