योग्य कौटुंबिक आणि शालेय वातावरण नसल्यास बुद्धिमान मुलांची कुचंबणा होते आणि ती अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकत नाहीत. परिणामतः मुलांना वैफल्य येते. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टया मागासलेल्या कुटुंबातील मुलांकडेही असेच दुर्लक्ष होते; त्यांनाही गुणास वाव मिळण्याजोगे वातावरण प्राप्त होत नाही. बुद्धिमान मुलांना शिक्षण देताना पुढील सर्वसाधारण तत्त्वे उपयुक्त ठरतात. प्रत्येक मुलाला जरी बुद्धी असली तरीही त्याला आकार देण्यासाठी योग्य शिक्षण हे द्यावेच लागते. तर त्याचा मेंदू अधिक चांगल्या प्रकारे व वेगाने विकसित होतो. बुद्धिमान मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यावयाचे असल्यास पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. या मुलांची अभिरूची किंवा कल लहानपणापासून दिसू लागतो. त्यानुसार त्याना योग्य व व्यक्तिगत स्वरूपाचे शिक्षण द्यावे लागते. Do it for intelligent children
या मुलांना व्यावसायिक शिक्षणातील पर्याय चटकन कळतात. त्यांपैकी कोणत्या व्यवसायात भविष्यकाळात काय प्रगती होऊ शकेल, याचा अंदाज करता येतो. त्यांच्या शिक्षणात काम आणि क्रीडा या पद्धतींचा सारखाच वापर करणे जरूर असते. विशिष्ट मुलात कोणत्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याची क्षमता आहे, हे लक्षात घेणे, अभ्यासक्रमाची सधन उद्दिष्टे स्पष्ट राखणे, विविध प्रकारच्या मुलांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आखणे, स्वतंत्र विचार, संकल्पना निर्मितिक्षमता, अमूर्त विचारक्षमता आणि वरच्या दर्जांची प्रगत शक्य होईल अशा तऱ्हेच्या अध्यापनपद्धती योजणे, त्यांच्या नेहमीच्या आणि विशेष शिक्षणात संतुलन ठेवणे, तसेच त्यात लवचिकता राखणे, विविध प्रकारची कोशल्ये शिक्षणाच्या वेगवेगळया स्तरांबर विकसित करता येतात यांची जाण ठेवणे गरजेचे असते.
लेविस टर्मन या मानसशास्त्रज्ञाने अमेरिकेतील एक हजार बुद्धिमान मुलांचा सतत अभ्यास केला आहे. बुद्धिमान मुलांच्या बाबतीत कुटुंबातील अध्यापन व शाळेत इयत्ता गाळून वर जाण्यास दिलेले प्रोत्साहन उपयोगी पडतात, हे त्या अहवालातील प्रमुख शैक्षणिक निष्कर्ष होत. या धर्तीवर बुद्धिमान मुले हुडकून काढून त्यांना प्रोत्साहन द्यावे ही कल्पना स्वतंत्र भारतात अधिक प्रमाणात पुढे आली. सामान्यतः शालेय विषयांतील प्रगती हाच निकष त्यासाठी लावला जातो. अलीकडे मात्र सामान्य ज्ञान, तार्किक विचार इ. चाचण्या शालेय अभ्यासाबरोबर घेतल्या जातात हे योग्यच आहे.