राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आता मोठा दावा केला आहे. ‘दिशा सालियन प्रकरणात 7 मार्चला सत्य समोर येईल. तेव्हा सगळा उलगडा होईल.’यात कोणाकोणाचा हात होता आणि कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल हे पण लवकरच समजेल.’ असा दावा देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.DISHA Salian Death: There is no politics in this case! The truth of Disha Salian’s death will come out after March 7; Chandrakant Patil’s big claim
काही राजकारण नाही घाबरु नका सत्य समोर येणार …..
‘दिशा सालियन प्रकरणात काही राजकारण नाही. घाबरु नका.. दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा.. सात मार्च.. सगळे पुरावे समोर येतील. कोणा-कोणाचा हात आहे कोणाकोणाला जेलमध्ये जायचंय.. उसनं आवसान आणणं जे चाललंय ना आणि वाट्टेल ती शिवराळ भाषा वापरणं चाललंय ना ते यासाठीच चाललं आहे.’
‘कसं आहे ना. दिवा विझण्यापूर्वी जसं फडफडतो. आपल्याला वाटतं दिवा लय प्रज्वलित झाला आहे. तर ती विझण्यापूर्वीची फडफड असते.’
‘दिशा सालियनाच्याबाबत नेमकं काय झालंय हे बंदिस्त आहे. परंतु 7 मार्चनंतर या प्रकरणाचा उलगडा होईल आणि यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल.’
असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे आता दिशा प्रकरणाला वेगळं वळण लागणार हे मात्र नक्की .