• Download App
    Dhirubhai Ambani धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाला; अजितदादांच्या वक्तव्यानंतर वाद उसळला!!

    Dhirubhai Ambani धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाला; अजितदादांच्या वक्तव्यानंतर वाद उसळला!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले. त्यामुळे त्यांनी आक्रमक प्रचाराचा सपाटा लावला. पण हा सपाटा लावताच त्यांनी चंद्रराव तावरे यांच्या वयावरून वादग्रस्त टीका केली. त्या पलीकडे धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरूनच कोट्याधीश झाला, असे पुढचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद उसळला. अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट‌ केला. मात्र, अमोल मिटकरी यांनी त्या वक्तव्याचा इन्कार केला.



    माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीसाठी स्वतः अजित पवार यांनी “ब” वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रचारादरम्यान पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्स येथे आयोजित सभेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांनी आपल्या भाषणात धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख करत एक विधान केलं. “पंपावर पेट्रोल सोडूनच धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला” असं एकेरी वक्तव्य केले. त्यामुळे सोशल मीडियावर वाद उसळला.

    “मला सहकार टीकवायचं नसतं, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? माझी गोरगरिबांची मुलं तिथं लागली ना कामाला. पंपावर काम करणं कमीपणाचं नाही, असं अजित पवार पुढे म्हणाले. मी जर सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खाजगी कारखाना काढायची तयारी नव्हती. सरकारने बंधनं घातली, पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.

    माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. अजित पवार यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनेल रिंगणात उतरल्याने ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.

    Dhirubhai Ambani became a millionaire by stealing petrol statement of ajit pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा; पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडविला!!

    भाजपच्या सत्तेची वळचण हवी; पण नको भगवी टोपी; काका – पुतण्यांची भूमिका नेहमीच दुटप्पी!!

    MMS Congress मूळात मनसेने काँग्रेसला प्रस्तावच पाठवलेला नाही; मग कसली महाविकास आघाडी आणि कसलं काय??