विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पेट्रोलच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय आहे. मात्र याद्वारे मिळालेले पैसे केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करत आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केले. Dharmendra Pradhan bats for oil rates
ते म्हणाले, “सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान उत्पन्न कमी राहिले आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत” असे प्रधान यांनी म्हटले आहे.
प्रधान म्हणाले, “ कॉंग्रेस पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान येथे इंधनाच्या दरांत का वाढ होत आहे, याचे उत्तर आधी राहुल गांधी यांनी द्यावे. त्यांची सत्ता असलेल्या राज्यांतील कर आधी त्यांनी कमी करावेत. इंधन दरामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र केंद्र सरकार वर्षभरात लसीकरणासाठी ३५ हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे. तसेच एक लाख कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजनेद्वारे आठ महिन्यांसाठी मोफत धान्य देण्यास सुरुवात केली आहे
या कठीण काळात, आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांनी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. आज मुंबईत सर्वांत महाग पेट्रोल यामुळे आहे. कारण महाराष्ट्रातील कर देशात सर्वाधिक आहे. राजस्थानमध्ये पेट्रोलवर जास्त आहे.” असे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
Dharmendra Pradhan bats for oil rates
महत्वाच्या बातम्या
- हाँगकाँग, झिजियांग प्रातांमधील मानवाधिकाराच्या हननावरून जी – ७ आणि मित्र देशांनी चीनला फटकारले
- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा चीनविरोधात आव आक्रमक; भाषा गुळमुळीत!!
- चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाला लोकशाही पर्यायी प्रकल्प देण्याचे जी – ७ देशांचे सूतोवाच
- Electric Vehicle : इलेक्ट्रिक दुचाकी आता होणार स्वस्त; केंद्र सरकारने अनुदानाची रक्कम वाढविली