• Download App
    ‘’... त्याशिवाय या क्षेत्रात येऊ नका’’ नाट्यक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीला धनंजय सरदेशपांडेंचा मोलाचा सल्ला! Dhananjay Sardeshpandes valuable advice to the young generation who wants to enter the theater sector

    ‘’… त्याशिवाय या क्षेत्रात येऊ नका’’ नाट्यक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीला धनंजय सरदेशपांडेंचा मोलाचा सल्ला!

    ‘द फोकस इंडिया’च्या ‘गप्पाष्टक’ कार्यक्रमात दिलखुलास चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  मराठी रंगमंचासाठी, नाट्यक्षेत्रासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे, असे लोकप्रिय कलावंत धनंजय सरदेशपांडे यांनी द फोकस इंडियाच्या ‘गप्पाष्टक’ कार्यक्रमात हजेरी लावत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. शिवाय, आपल्या नाट्यक्षेत्रातील अनुभवाबाबतही माहिती दिली. दरम्यान, नाट्यक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरूण पिढीसाठी त्यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. Dhananjay Sardeshpandes valuable advice to the young generation who wants to enter the theater sector

    धनंजय सरदेशपांडे म्हणतात, ‘’स्वत:ला आधी शोधा, स्वत:चा शोध घ्या. मला काय येतं, मी कशात चांगला आहे. उगाचच मला नट व्हायचंय  असं जर प्रत्येकजण उठून म्हणत असेल. तर आज इतका स्ट्रगल आहे, साधी गोष्ट नाही. एकवेळेस तुम्हाला एखादी मालिका मिळूनही जाईल, पण नंतर काय?’’

    याचबरोबर ‘’माझं असं म्हणणं आहे की, तुम्ही मेहनत करा. सातत्य ठेवा, तुम्ही स्वत:ला तपासा. नेपथ्य चांगलं येत का?, संगीत चांगलं येतं का?, नृत्य चांगलं येतं का? सगळं बघितलं पाहिजे. अन्य क्षेत्रातील मुलं अभ्यास करतातच  ना, मेहनत घेतातच ना?, मग  नाटकात कसं काय असं न करून जमेल. तुम्हाला काहीतरी आलं पाहिजे ना? काहीच येत नसेल तर इथेही येऊ नका?’’ असंही धनंजय सरदेशपांडेंनी यावेळी सांगितलं.

    याशिवाय, ‘’तुम्ही थोडाफार तरी तुमचा स्वत:चा अभ्यास करा. माझं म्हणणं आहे की आधी स्वत:ला शोधा. स्वत:ला तपासून घ्या, की मी कुठे आहे. मला काय जमेल. तुम्हाला समजत नसेल, तर लोकांना विचारा की मी काय करू शकतो. तज्ज्ञ व्यक्तीही बसलेले आहेत, काहीवेळेस ती सांगतील, काहीवेळा शिव्या देऊन सांगतील. पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल की मी काय आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येऊ नका.’’ असा मोलाचा सल्ला सरदेशपांडे यांनी गप्पाष्टक कार्यक्रमात बोलताना तरूणांना दिला.

    Dhananjay Sardeshpandes valuable advice to the young generation who wants to enter the theater sector

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…