• Download App
    Dhananjay mundhe: करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल : परळीत मध्ये तणावाचे वातावरण Dhananjay mundhe: A pistol in Karuna Munde's car, an atmosphere of tension in Parli

    Dhananjay mundhe: करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल : परळीमध्ये तणावाचे वातावरण

    विशेष प्रतिनिधी

    बीड : गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेल्या करुणा मुंडे या आज बीडमधील परळी शहरात दाखल झाल्या असून त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिस्तूल त्यांचेच आहे का तसेच याचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.Dhananjay mundhe: A pistol in Karuna Munde’s car, an atmosphere of tension in Parli

    परळी मध्ये करुणा मुंडे दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

    मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे करुणा मुंडेनी म्हटलं, मला गावात यायला का अडवता? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.

    मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे. परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

    करुणा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थही जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पहायला मिळत आहे. या प्रकरणात आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका गेतात हे पहावं लागेल.

     

     

    Dhananjay mundhe: A pistol in Karuna Munde’s car, an atmosphere of tension in Parli

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस