कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.Dhananjay Munde Vs Karuna Munde: Dhananjay Munde hides six children and several wives; Karuna Munde’s shocking allegation
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : धनंजय मुंडेनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडेंच्या या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे.Dhananjay Munde Vs Karuna Munde: Dhananjay Munde hides six children and several wives; Karuna Munde’s shocking allegation
व्यैयक्तीक वादामुळे चर्चेत आलेल्या करुणा मुंडे या आता थेट निवडणुीच्या रिंगणात उतरल्या आहेत. जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक लढवण्याचा निर्णय करुणा मुंडे यांनी घेतला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या आहेत करूणा मुंडे?
”धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अनेक बायका आणि सहा मुलं लपवली आहेत. त्यामुळे आता त्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत.” असा इशाराही करूणा शर्मा यांनी दिला आहे. करूणा मुंडे आणि माझे परस्पर सहमतीने संबंध होते हे धनंजय मुंडे यांनी मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातच मान्य केलं आहे. तसंच त्यांच्या मुलांना आपण नाव देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. कोल्हापुरातील घराणेशाही तील राजकारण संपवणार. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे.